मुंबई | वरिष्ठ पोलीस अधिकारी संजय पांडे यांची मुंबईच्या पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी संजय पांडे यांच्याकडे महासंचालक जबाबदारी होती. परंतु, गेल्या काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी रजनीश शेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर संजय पांडे यांच्याकडे आता मुंबई पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सध्या संजय पांडे हे चंदीगढमध्ये असल्याची माहिती एच. डब्ल्यू. मराठीच्या सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. मुंबई पोलीस आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आलेल्या संजय पांडे यांच्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ या.
संजय पांडे यांनी कानपूर आयआयटीमधून आयटी कम्प्युटरमध्ये इंजिनीअरिंगचे पदवी घेतली आहे. हे १९८६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पांडेंची प्रथम पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पुणे शहरात कामाला सुरुवात केली आहे. यानंतर त्यांची मुंबईतील डीसीपी रँकचे अधिकारी बनले. संजय पांडेंनी १९९२ मध्ये मुंबईतील दंगलीच्या वेळी धारावीमधील दंगल नियंत्रण आणि सामाजिक एकोप्या राखण्यासाठी पहिल्यांदा मोहल्ला समितीची स्थापना केली. तर १९९२- ९३ दरम्यान, दंगलीच्या वेळी संजय पांडे यांनी चांगले काम केल्याचा उल्लेख श्री कृष्ण आयोगाच्या अहवालात देखील करण्यात आला होता.
तसेच मुंबईतील चार मोठे पोलीस स्टेशन एकत्र करून झोन ८ बनवण्यात आले होते. तेव्हा संजय पांडे हे त्या झोनचे पहिले डीसीपी बनले होते. त्या झोनमध्ये त्यांनी तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला होता. दरम्यान, १९९५ मध्ये नार्कोटिक्स विभागाचे डीसीपी म्हणून शहरातील ड्रग्ज रॅकेटला देखील त्यांनी आळा घातला होता. १९९७ मध्ये इकॉनॉमिक ऑफेन्स विंगमध्ये असताना संजय पांडेंनी अभ्युदय बँक घोटाळा, चमडा घोटाळ्याचा तपास करून त्यात झालेल्या भ्रष्टाचाराचा खुलासा केला होता. यानंतर पांडेंनी १९९८ मध्ये हॉवर्ड विद्यापीठातून पुढील पदव्युत्तर शिक्षण घेतले असून १९९९ मध्ये एसपीजी मध्ये असताना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत देखील ते तैनात होते.
दरम्यान, संजय पांडे यांनी २००१ मध्ये राजीनामा दिला होता. पंरतु, पांडेंचा राजीनामा मंजूर केला नाही, हे प्रकरण न्यायालयात गेले होते. यानंतर २००५ मध्ये पांडे हे पुन्हा सेवेत रुजू झाले होते. मग, पांडेंनी पोलीस कारकीर्दीच्या २० वर्षांच्या सेवेनंतर देखील त्यांनी स्वेच्छानिवृत्तीची इच्छा व्यक्त केली होती, परंतु, पांडेंची इच्छा पूर्ण झाली नाही. न्यायालयीन लढाई लढल्यानंतर २०११ मध्ये पुन्हा सेवेत रुजू झाले होते. २०१४-१५ साली लीगल मॅट्रोलॉजी डिपार्टमेंट कंट्रोलर मेजरमध्ये असताना बिल्डरांकडून फ्लॅट्सच्या कार्पेट एरियातील चोरी उघड केली. या पोंडेंनी लोढा बिल्डरवर कारवाई केली होती. यानंतर २०१५ मध्ये पांडेंना होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बनले होते. आणि यानंतर संजय पांडेंनी ९ एप्रिल रोजी महाराष्ट्राचे महासंचालक पदाचा कार्यभार सांभाला होता.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.