बुलडाणा | स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या शेतातील सोयाबीन गंजीला आग लावल्याची घटना घडली. या आगीत ३ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती तुपकर यांनी दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.रविकांत तुपकर यांच्या शेतातील ६५ ते ७० क्विंटल सोयाबीनच्या गंजीला आग लावल्याने साधारण 3 लाख रुपयांचे नुकसान झालं आहे. ही घटना काल (१६ ऑक्टोबर) रात्री घडली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून आरोपींना लवकरात लवकर पकडण्यात यावे, अशी मागणी तुपकर यांनी केली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश नेते रविकांत तुपकर यांच्या सावळा येथील शेतातील सोयाबीन सुड्यांना आग लावण्यात आली आहे. हा सर्व प्रकार काल सकाळी 10.00 वा उघडकीस आला. या आगीत त्यांचे 3 लाखापेक्षा अधिक नुकसान झाले आहे. हा प्रकार राजकीय वैमनस्याचा असून ज्यांना समोरासमोर लढायची हिंमत नसते. अशांनीच आग लावण्याचे काम आहे असे कतीतीही त्रास देण्याचे प्रयत्न केले तरी माझा आवाज दाबता येणार नाही अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे.
तुपकर यांची सावळा येथे शेती असुन स्वतः तुपकर,त्यांच्या पत्नी,आई-वडील व भाऊ मिळून शेती पाहतात. यावेळी त्यांनी शेतात सोयाबीन पेरली होती. या संदर्भात बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
“सोयाबीनच्या गंजीला आग लावण्याचा प्रकार राजकीय वैमनस्याचा असून ज्यांना समोरासमोर लढायची हिंमत नसते, अशा व्यक्तींनी ही आग लावण्याचे काम केले आहे. कितीही त्रास देण्याचे प्रयत्न केले, तरी माझा आवाज दाबता येणार नाही”, अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी दिली आहे.”आई वडिलांनी मेहनतीनं पीक आणलं होतं. अतिवृष्टीमुळे शेतकरी वाईट परिस्थितीत असून त्यांना आधाराची गरज आहे. अशा वेळी सोयाबीन पेटवल्यामुळे शेतकरी भयभीत आहे. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपीवंर कठोर कारवाई करावी”, अशी मागणी तुपकरांनी केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.