HW News Marathi
Covid-19

विरारमधील कोव्हिड सेंटरला आग! १३ रूग्णांचा होरपळून मृत्यू …

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रूग्णसंख्येची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे.याच दरम्यान काही घटनांमुळे महाराष्ट्र सुन्न झाला आहे.नाशिकमधील ॲाक्सिजन गळतीमुळे तब्बल २४ जणांचा मृत्यु झाला त्यानतंर आता विरारमधील विजय वल्लभ हॅास्पिटलमध्ये आज पहाटे आग लागली.ज्यामध्ये १३ रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,विजय वल्लभ हॅास्पिटलमध्ये पहाटे ३ च्या दरम्यान आयसीयु विभागातील एसीचा स्फोट झाल्याने ही आग लागल्याचे सांगितले जात आहे.या विभागात १७ रूग्ण उपचार घेत होते ज्यांच्यापैकी १३ जणांचा मृत्यु झाला असल्याचे कळत आहे.या ठिकाणी जे कोविड सेंटर होते तेथील लोकांना आत दुसरीकडे हलवण्यात येत आहे.महाराष्ट्रात गेल्या २ दिवसांत झालेल्या या दुसऱ्या दुर्दैवी घटनेमुळे सामान्य नागरिकांमध्ये रोष असल्याचे पाहायला मिळत आहे .

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात ३१ मेनंतर लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, पंतप्रधान मोदी-गृहमंत्री शहा यांची बैठक

News Desk

रश्मी ठाकरेंच्या सुरक्षा रक्षकालाही कोरोनाची लागण

News Desk

सुप्रिया सुळे यांना कोरोनाची लागण; अनेक कार्यक्रमांना उपस्थिती

News Desk