अहमदनगर । “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे भाजपमध्ये प्रवेश करणार होते, भाजप प्रवेश करण्यासाठी त्यांनी कुणाकुणाच्या भेटी घेतल्या त्याचीही माहिती माझ्याकडे आहे,” असा दावा देखील भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. विखे पाटील यांच्या आरोपावर बाळासाहेब थोरात यांनी प्रत्युत्तर देत म्हणाले की, “भाजपच्या नेत्यांना मी हे सांगायला भेटलो होतो की, “आमची चांगले लोक तुमच्याकडे पाठवतो आणि तस घडलेही,” असा टोला त्यांनी लगावला.
विखे पाटील पुढे म्हणाले की, “बाळासाहेब थोरातांना सगळे अपघाताने मिळाले आहे. त्यात त्यांचे स्वत:चे कतृत्व काहीच नाही. अहमदनगर जिल्ह्यातील १२ पैकी तीन जागा त्यांनी लढवल्या. त्यात त्यांना कसेबसे यश मिळाल्याचे ते म्हणाले. त्यामुळे थोरात यांनी माझ्या काँग्रेस पक्षाच्या प्रवेशाची चिंता करु नये. कारण, दोन-तीन वर्षांपूर्वी थोरात भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी प्रयत्नात होते, असा गौप्यस्फोट विखे-पाटील यांनी केला.
विखेंच्या आरोपावर काय म्हणाले बाळासाहेब थोरात
“विखे पाटलांनी यांच्या वक्तव्यांना फार महत्व देण्याची गरज नाही. माझ्या मनातही काँग्रेस सोडण्याचा विचार कधीच आलेला नाही. काँग्रेसच्या विचाराने आजपर्यंत मी काम करत आलो आहे. आणि यापुढेही करत राहणार आहे, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली. आता सत्ता बदलली आहे, तर कोण कोण बदलेल हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळेच त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली असावी, असा टोलाही बाळासाहेब थोरातांनी विखे पाटलांना लगावला. मल्लिकार्जुन खर्गे यांना विखे पाटील भेटले की नाही मला माहित नाही,” असेही त्यांनी सांगितले.
विवाह सोहळात पाटील आणि थोरात एकाच सोफ्यावर बसले
विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात या दोन्ही नेत्यांमध्ये हजेरी लावली. काल (२८ डिसेंबर) दिवसभरात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू होते. त्याचवेळी बाळासाहेब थोरात आणि विखे हे दोघे संगमनेर तालुक्यातील नामदेव गुंजाळ यांच्या मुलीच्या विवाह सभारंभासाठी हजर होते. आणि दोघे एकाच सोफ्यावर बसले असून या दोघांमध्ये चर्चा ही झाल्याचे पाहायला मिळले. मात्र, या दोघांमध्ये नेमक्या काय चर्चा झाल्या हे जाणून घेण्यास सर्वचण उत्सुक आहेत.