HW News Marathi
Covid-19

पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

पुणे | पुण्यातील ससून रुग्णालयात पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याची माहिती आज (२१ मे) पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. “प्लाझ्मा थेरपीमुळे उच्च रक्तदाब आणि अतिस्थूल असलेली कोरोनाबाधित व्यक्ती ठणठणीत बरी झाली आहे. १० आणि ११ मे या दिवशी प्लाझ्मा थेरपी केलेल्या रुग्णाला आता कोविड वॉर्डमधून हलवण्यात आले आहे. ससूनच्या सर्व डॉक्टर्स आणि टीमचे अभिनंदन”, असे ट्विट करत मुरलीधर मोहोळ यांनी ही माहिती दिली आहे. नवी दिल्ली येथील सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रल ऑर्गनायजेशने (सीडीएससीओ) २५ मे रोजी बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाला पुण्यात कोरोनाबाधितांवर प्लाझ्मा थेरपीसाठी मान्यता दिली आहे. पुण्यात कोरोनाबाधितांवर बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्यांचा हा प्रस्ताव केंद्राने मान्य केला होता.

संपूर्ण जगभराला सध्या कोरोनाचा विळखा आहे. मात्र, सद्यस्थितीत आपल्याकडे कोरोनावरचे कोणतेही उपचार, लस उपलब्ध नसल्याने आपल्यापुढे मोठे आव्हान आहे. त्यात आता कोरोनावर उपचार म्हणून प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत असल्याची चर्चा होती. म्हणूनच देशात प्लाझ्मा थेरपीसाठी परवानगी देखील मिळवण्यात आली. दरम्यान, सर्वप्रथम चीनमध्ये या थेरपीचा उपचार करण्यात आला. चीनमध्ये ५ कोरोना रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण पुढच्या १२ दिवसांत त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे म्हटले जात आहे. तर कोरोनाचे रुग्ण या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असल्याचा दावा अमेरिकन जर्नलमध्ये देखील करण्यात आला आहे. मात्र, ही थेरपी कोरोनारुग्णवर खरंच कोरोना रुग्णांसाठी फायदेशीर ठरते का ? याबाबत वैद्यकीय क्षेत्रात अनेक मतमतांतरे आहेत.

संबंधित बातम्या :

पुण्याच्या ससून रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीला केंद्रकडून मिळाली परवानगी

राज्यातील २ रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा चांगला परिणाम !

लिलावती रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासांत ८३,८०९ नवे रुग्ण आढळले

News Desk

सायबर गुन्हे दाखल करण्यात महाराष्ट्रात बीड अव्वल !

News Desk

Unlock 1.0 | मुंबईच्या रस्त्यावर पुन्हा एकदा वाहनांची गर्दी

News Desk