HW News Marathi
महाराष्ट्र

पहिले कोरोना टेस्ट किट जन्माला घातले आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला…

मुंबई | कोरोनाच्या निदानासाठी आत्तापर्यंत आपला देश बाहेरुन किट मागवत होता. परंतु, कोरोनाच्या निदानाचा किट मायलॅब डिस्कवरी सॉल्यूशन या पुण्यातील कंपनीने विकसित केला आहे. दरम्यान, या किटच्या विकसनात महिला विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भोसले यांचा महत्त्वाचा हात आहे. काही तासांवर त्यांची प्रसुती होणार होती पण आधी या किटचे त्यांनी संशोधन केले आणि मगंच बाळाला जन्म दिला त्यामूळे त्यांचे विशेष कौतुक गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. मिनल भोसले यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातले आणि नंतर आपल्या बाळाला जन्म दिला असे म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरद्वारे त्यांचे कौतुक केले आहे.

“विषाणूतज्ज्ञ मिनल दाखवे-भासले यांनी आधी भारतातील पहिलं कोरोना टेस्ट किट जन्माला घातलं आणि नंतर स्वतःच्या बाळाला जन्म दिला. पुण्याच्या डॉ. मीनल दाखवे भोसले यांचे अनंत आभार. अशा कर्तव्यनिष्ठ माणसांसमोर मान आदराने झुकते,” अशा शब्दांत आव्हाडांनी शुभेच्छा आणि कौतुक केले आहे.

मायलॅबने विकसित केलेले कोरोनाचे निदान करणारे हे देशातील पहिले किट असल्याचा दावा केला जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे या किटची निर्मिती ६ आठवड्यांच्या विक्रमी कमी वेळात केली आहे. साधारणत: हे किट विकसित करण्यासाठी ३ ते ४ वर्षाचा कालावधी लागतो. परंतु, मायलॅबची कोरोना किट ही केवळ दोन ते अडीच तासांमध्ये संबंधित नमुना कोरोना पॉझिटीव्ह आहे की नाही याचा रिपोर्ट देते. परदेशातून मागवलेल्या आणि सध्या भारतात वापरल्या जाणाऱ्या किट्सला हाच रिपोर्ट द्यायला साधारण ६-७ तास लागतात, अशीही माहिती मिनल भोसले यांनी दिली आहे. दरम्यान, या किटला ‘पॅथो किट’ असे नाव दिले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ठाकरे सरकारकडून अनेक नावांची शिफारस, केंद्राने प्रदान केला फक्त एक पद्म!

News Desk

मुंबईत फेरीवाला धोरण लागू करा, BMC विरोधात आंदोलन करण्याचा भाजपचा इशारा

Aprna

‘व्यर्थ न हो बलिदान, चलो बचाये संविधान’,वडूजमध्ये अभियानाची सांगता ! 

News Desk