HW News Marathi
महाराष्ट्र

पोलीस पाटी व चिन्ह असलेले स्टिकर्स लावल्याचे आढळल्यास वाहनांवर होणार कारवाई

मुंबई। अनेक पोलीस अधिका-यांनी आपल्या खासगी वाहनांवर पोलीस स्टिकर्स आणि चिन्हं लावली आहेत, जी अधिकृत नाहीत, त्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त करत संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिसांना दिले आहेत. मुंबई पोलिसांनी याबाबत अधिकृत नोटीसही जारी केली असून, पोलीस अधिकाऱ्यांच्या खासगी वाहनांवरील असे स्टिकर्स मार्गदर्शक तत्त्वांच्या विरोधात असून त्यावर बंदी घालण्यात आली आहे व याचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, असे स्पष्ट केले.

पोलिसांनीच कायद्याचे उल्लंघन करणे हे पोलिसांची प्रतिमा मलीन करण्यासारखे आहे. अशा प्रकारे पोलीस पाटी लावलेली वाहने नाकाबंदी तसेच सुरक्षा तपासणी न होता सोडली जातात. त्यामुळे पोलीस पाट्यांचा दुरुपयोग करून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच अशा प्रकारच्या वाहनांमार्फत घातपात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तरी सर्व प्रभारी पोलीस निरीक्षक यांनी त्यांच्या अधिपत्याखालील अधिकारी अंमलदार यांना त्यांच्या खाजगी वाहनावर ‘पोलीस’ पाटी किंवा पोलीसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स काढून टाकण्याबाबत अवगत कले आहे. यापुढे अशा प्रकारची पोलीस पाटी किंवा पोलिसांचे चिन्ह असलेले स्टिकर्स लावल्याचे आढळून आल्यास संबंधित पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

उद्धव ठाकरे सरकार चालवतात की माफियांची टोळी, किरीट सोमय्या यांचा सवाल

News Desk

“पहाटेच्या शपथविधीसाठी राष्ट्रवादी आणि भाजप पुन्हा एकदा एकत्र येणार”, राजू शेट्टींचं सूचक विधान

News Desk

वास्तविक हा सरपंच पदाचा लिलाव नसून लोकशाहीचा लिलाव केलाय – अण्णा हजारे  

News Desk