HW News Marathi
महाराष्ट्र

आधी सुसाईड नोट, आता सीडीआरमध्ये पुरावे, पोलीस कसून तपास करणार, महंत नरेंद्र गिरींच्या आत्महत्येचं गूढ उकलणार?

प्रयागराज। नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. आणि त्यानंतर आता अनेक गोष्टी समोर यायला सुरुवात झाली आहे. नरेंद्र गिरी हे अल्लापूरच्या बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत आढळले होते. मात्र आता महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे. कारण, आधी पोलिसांना एक सुसाईड नोट सापडली होती तर आता कॉल डिटेल रेकॉर्ड म्हणजेच सीडीआरमधून अनेक पुरावे मिळाल्याचं सांगितलं जात आहे. मृत्यू होण्याच्या 6 ते 10 तास आधी ज्या ज्या लोकांशी नरेंद्र गिरी बोलले, त्या सर्वांची आता चौकशी होणार आहे. पोलिस तपासादरम्यान नरेंद्र गिरी महाराज यांच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली होती. ही सुसाईड नोट तब्बल 7 पानी असल्याचं कळतं आहे. तसंच या चिठ्ठीत शिष्य आनंद गिरी यांच नाव लिहिल्यानं आता आनंद गिरी यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु आहे.

मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला

सुसाईड नोटच्या आधारावर नरेंद्र गिरी यांचा शिष्य आनंद गिरीची चौकशी सुरु आहे. या चौकशी दरम्यान, नरेंद्र गिरी यांनी आत्महत्या केल्याची शक्यता त्याने नाकारली आहे. तो म्हणाला की, प्रयागराजचे आयजी यात संशयित आहे, ते सतत नरेंद्र गिरी यांच्या संपर्कात असायचे. आनंद गिरीने आरोप केला की, मठ आणि मंदिराजवळ असलेली संपत्ती हडपण्यासाठी महंत नरेंद्र गिरी यांची हत्या झाली. या कटात अनेक मोठे मासे गुंतलेले असू शकतात. हा कोट्यवधींचा खेळ आहे. विशेष गोष्ट म्हणजे, नरेंद्र गिरी यांच्या सुसाईड नोटमध्ये आनंद गिरी, आद्या तिवारी आणि संदीप तिवारी यांनी मानसिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं

मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी आखाडा परिषदेचे महंत नरेंद्र गीरी यांचा मृतदेह बाघंबरी मठातील त्यांच्या खोलीत नायलॉनच्या दोरीला लटकलेल्या अवस्थेत मिळून आला. पोलिसांना या प्रकाराची माहिती संध्याकाळी सव्वा पाच वाजता मिळाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह त्यांच्या मठातील खोलीत मिळून आला. मृतदेह दोरीला लटकलेल्या अवस्थेत होता आणि खोलीचे सर्व दरवाजे बंद होते. खोलीचा मुख्य दरवाजाही आतून बंद होता. प्राथमिक तपासात ही आत्महत्या असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला पाचारण केलं. त्यानंतर पुरावे गोळा करण्याचं काम सुरु करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जवळपास 7 पानी चिठ्ठी आढळून आली

प्रयागराज पोलिसांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे की घटनास्थळावर जवळपास 7 पानी चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीत महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांचे शिष्य आनंद गिरी आणि अन्य शिष्यांचं नाव लिहिलं आहे. तसंच ते अनेक कारणांमुळे मानसिक तणावातून जात होते. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे.महंत नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये आश्रमबाबत काय करायचं याबाबतही लिहिलं आहे. तसंच कुणाची काळजी घ्यायची. कुणाला काय द्यायचं आहे, याबाबतही त्यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलाय. आपल्या शिष्यांमुळे दु:खी असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बी एच आर मुळे हजारोंचे संसार उध्वस्त झाले ! एकनाथ खडसे

News Desk

नितीन गडकरी चांगला माणूस पण चुकीच्या पक्षात – अशोक चव्हाण

News Desk

तुम्ही खलनायकाची भूमिका निभावली म्हणून मी हिरो ठरले, कंगनाचा सरकारला टोला

News Desk