HW News Marathi
महाराष्ट्र

जागतिक आरोग्य दिनानिमित्त उद्या ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम

मुंबई | जागतिक आरोग्य दिनानिमित्त सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने ‘फिट महाराष्ट्र’ उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाचे उद‌्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.

गेटवे ऑफ इंडिया येथे उद्या म्हणजेच गुरुवारी, 7 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, वस्त्रोद्योग मंत्री तथा मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री आदित्य ठाकरे, सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर उपस्थित राहणार आहेत, असे टोपे यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की, जागतिक आरोग्‍य दिन 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. गंभीर आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने यंदा Our Planet, Our Health हे घोषवाक्य निश्चित केले आहे. याच पार्श्वभूमीवर कोविड –19 महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्थेसमोर उभी राहिलेली आव्हाने, वाढत्या प्रदुषणामुळे मानवी जीवनावर होणारा परिणाम, जीवनशैलीमुळे उद्भवणारे आजार यांच्याबाबत जाणीव जागृती करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमाअंतर्गत बलून फेस्टिवल, ध्यान आणि आहार विषयक व्याख्यान यांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मुंबई महानगर पालिका आणि मेड स्केप इंडिया यांचेही सहकार्य लाभत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“उदयनराजेंचे जे अश्रू आहेत ते महाराष्ट्राचे अश्रू”, संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा

Aprna

पालघर, भंडारा-गोंदियाचे आज मतदान

News Desk

मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यांवर गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या वाहनांसाठी स्वतंत्र मार्गिका करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

Aprna