HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

साईबाबांच्या जन्मस्थळावरून राजकारण करून नका !

शिर्डी | साईबाबांच्या जन्मस्थळावरून राजकारण करून नका, असा सल्ला माहिती अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिला आहे. भुजबळ पुढे म्हणाले की, पाथरी आणि शिर्डी या दोन्ही बाजू ऐकून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतली, असे ते यावेळी माध्यमांशी बोलाताना म्हणाले. छगन भुजबळ म्हणाले की, शिर्डी बंद करून वाद संपणार नाही. मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून वाद मिटविण्याचा सल्लाही त्यांनी शिर्डीच्या ग्रामस्तांना दिला आहे. पाथरी आणि शिर्डीकरांनी शांताने चर्चा करावी, असे आवाहन त्यांनी शिर्डीत आज (१९ जानेवारी) दर्शनासाठी गेल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत केले आहे.

साईबाबांचे जन्मस्थळ पाथरी असलेल्या वादाच्या निषेधार्थ आजपासून शिर्डीत बेमुदत बंदला सुरुवात झाली आहे.  शिर्डी ग्रामस्थांनी शनिवारी (१८ जानेवारी) रात्री झालेल्या ग्रामसभेत हा निर्णय घेतला आहे. शिर्डी बंद काळात साईबाबा मंदिर भक्तांनसाठी खुले राहणार असून दुकाने, बाजार मात्र बंद राहतील. शिर्डीतील कडकीत बंद पाडळ्यामुळे साईबाबांच्या दर्शनसाठी गेल्या भक्तांचे हाल होत आहे.

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी  पाथरी आणि शिर्डीच्या नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मुख्यंत्र्यांप्रमाणे मी देखील कोणाच्या भावना न दुखवता  चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन करतोय. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बैठक घेतील. मुख्यमंत्री या बैठकीत पाथरी आणि शिर्डीच्या लोकांचे म्हणणे  ऐकूण त्यावर योग्य निर्णय घेतील”, असे अजित पवार  म्हणाले. नगर-परभणीतील जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मुख्यमंत्र्यांसोबत उद्या (२० जानेवारी) होणाऱ्या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची खासदार सदाशिव लोखंडे यांनी माहिती दिली आहे.

 

भुजबळांच्या पत्रकार परिषदेतील महत्तवाचे मुद्दे

 • साईबाबांच्या जन्मस्थळावरून राजकारण करून नका, भुजबळांचा सल्ला
 • दोन्ही बाजू ऐकून मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतली
 • साईबाबांना कुठलाही झेंडा, जात आणि धर्माचे वावडे नाही -भुजबळ
 • साईबाबा संकटात सापडू शकत नाही
 • शिर्डीचे महत्त्व काय महत्वाचे राहणार आहे
 • साईबाबांंची देशभरात मंदिर आहे
 • पाथरी आणि शिर्डीकरांनी शांताने चर्चा करावी, असे आवाहन
 • देशभरात आधीत भरपूर प्रश्न आहे
 • देशभरातून शिर्डीत मोठ्यासंख्येने साई भक्त दर्शनाला येतात
 • मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करून वाद मिटविण्याचा सल्ला
 • शिर्डी बंदचा फटका नाहक भक्तांना पडत आहे
 • मी शिर्डीत दर्शनाला आलोय
 • साईबाबांचा जन्मस्थळाचा वाद उकरून काढण्याची गरज नाही
 • शिर्डी बंद करून वाद संपणार नाही

Related posts

फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, मराठवाड्याच्या पाण्यासाठी नदीजोड प्रकल्पास मान्यता

News Desk

अशोक चव्हाणांच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे महाविकासआघाडीत नाराजी नाट्य ?

अपर्णा गोतपागर

रेल्वे प्रशासनाचा सर्वात मोठा निर्णय, मुंबईची लोकल ट्रेन ३१ मार्चपर्यंत बंद

rasika shinde