HW News Marathi
महाराष्ट्र

अन्नदात्याच्या मदतीला आई आली धावून

करमाळा | करमाळा तालुक्यातल्या घोटीमध्ये रहाणा-या नागनाथ सदाशिव दुधे या शेतकऱ्याचा गोठ्यासह घरातील वस्तू जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी घडली. दुधे यांच्या घरातून जळत असलेली दिव्याची वात उंदीर गोठ्यात घेऊन गेला. घराच्या लगत गोठा असल्यामुळे पहाटे ५ च्या दरम्यान गोठ्याला भीषण आग लागली काही क्षणातचं अगीने पेट घेतल्यामुळे बघता-बघता सर्व जळून खाक झाले.

अचानक आग लागल्याने गोठ्यात असलेल्या शेळ्या, कोंबड्या बंदिस्त असल्यामुळे त्यांना आपली सुटका करून घेता आली नाही. यामध्ये 11 शेळ्या, वासरू व 30 कोंबड्यांचा आगीत मृत्यू झाला. नंतर ही आग जवळ असलेल्या घराला लागल्यामुळे घरातील सर्व जीवनावश्यक वस्तू जळून आगीमध्ये जळून खाक झाल्या. दिघेंचा संसार या घटनेनंतर उघड्यावर आला असून यामध्ये महत्वाची कादगदपत्रे आधार कार्ड,मतदान कार्ड, रेशनकार्ड अशी महत्वाची कागदपत्रे देखील जळून गेली आहेत. ही घटना समजताच शुभम थोरात व अतुल खूपसे यांनी स्वता बाहेर असल्यामुळे आईला हा सर्व प्रकार सांगून मदत करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्या आईने जीवनआवश्यक रोजच्या वापरातल्या वस्तू या कुटुंबाला दिल्या आहेत. त्यामध्ये 20,000 रुपयांची भांडी , कपडे, 2 पोती धान्य इतर आवश्यक गोष्टींची मदत त्या शेतक-याच्या कुटुंबाला केली आहे.

करमाळ्याचे तहसीलदार अतुल खूपसे यांच्या आईने केलेली मदत पाहूण सध्या सर्वचजण त्यांचे कौतुक करत आहेत. पिडीत शेतकऱ्याने अतुल खूपसे यांना संबंधित प्रकार सांगितला आणि सरकारकडून मदत होण्यसाठी मागणी केली आहे. परंतु सरकार कडून मदत होई पर्यंत शेतकऱ्याला आपला संसार उघड्यावर मांडवा लागणार ह्याची खंत मनात ठेवून सरकारच्या आधी अतुल यांच्या आई यांनी मदत करत माणुसकी काय असते याचे जिवंत उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. एकीकडे 350000 लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत.अशा शेतकऱ्यांसाठी आपण समाजाचे एक घटक आहोत याची जाणीव ठेवून यांच्या मदतीस हातभार लावून दिलासा देण्याचे काम करावे असे अतुल खूपसे यांच्या आईनी यावेळी सांगितले.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, मेरी कोशिश है कि ये सूरत बदलनी चाहिए ।

News Desk

राज्यात १ लाख ९७ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप, तर ७ हजार ८३० क्विंटल अन्नधान्याचे वाटप

News Desk

विनोद तावडे यांच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

News Desk
महाराष्ट्र

सांगलीत १४ वर्षीय मुलाला मगरीने पाण्यात ओढले

News Desk

सांगली | सांगलीच्या ब्रम्हणाळमध्ये शुक्रवारी कृष्णा नदीच्या पात्रात एका मगरीने १४ वर्षाच्या मुलाला पाण्यात ओढल्याची धक्कादायक घटना घडली. अचानक मगरीने हल्ला करत मुलाला पाण्यात ओढल्यामुळे परिसरात मगरीची दहशत निर्माण झाली आहे. गरमीचे प्रमाण वाढल्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रात काही मुले पोहत असताना ही घटना घडली आहे. मगरीने ज्या मुलाला पाण्यात ओढले तो मुलगा बेळगावरुन आपल्या मामाच्या गावी आला होता. अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.

अपघाताची माहिती मिळताच वनविभागाचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या पथकाने रात्री उशिरापर्यंत मुलाचा शोध घेतला परंतु अद्याप या मुलाचा शोध लागलेला नाही. रात्री साडेआठपर्यंत वनविभागच्या पथकाकडून मुलाचा शोध सुरु ठेवण्यात आला होता. रात्री उशीरा ही शोधमोहीम वनविभाकडून थांबविण्यात आली होती परंतु स्थानिकांनी मात्र अजूनही मुलाचा शोध सुरु ठेवला आहे. स्थानिकांनी या मुलाला मगरीने पाण्यात ओढताना पाहीले असल्यामुळे त्याचा शोध घेणे प्रशासनासाठी अधिकच आव्हानात्मक झाले आहे.

Related posts

पंडित नेहरूंवर टीका करणे राज्यपालांना शोभत नाही, नाना पटोलेंचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल!

News Desk

सोलापुरातील जि. प. शाळांच्या १६४ इमारती धोकादायक

News Desk

टाळ-मृदंगाच्या गजरात श्री संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

News Desk