HW News Marathi
Covid-19

पहिल्यांदा एका दिवसात तीन हजार ‘कोरोना’ रुग्ण, राज्याने ओलांडला ५० हजाराचा टप्पा

मुंबई | महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेला काही दिवसात वेगाने वाढ होत आहे. राज्यात आज (२४ मे) पहिल्यांदा एकाच दिवसात तीन हजार रुग्ण आढळले आहे. आज ३,०४१ रुग्ण आढळले असून आता राज्यातील रुग्णांच्या संख्येत ५० हजार रुग्णाचा टप्पा ओलांडला आहे. राज्यातील एकूण रुग्ण ५० हजार २३१ वर पोहोचली आहे. राज्यभरात १४ हजार ६०० रुग्ण बरे झाले आहेत.राज्यात सध्या ३३ हजार ९८८ रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ३ लाख ६२ हजार ८६२ नमुन्यांपैकी ३ लाख १२ हजार ६३१ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर ५० हजार २३१ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४ लाख ९९ हजार ३८७ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ३५ हजार १०७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज ५८ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून एकूण संख्या १६३५ झाली आहे. आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ३८ मृत्यू हे मागील २४ तासांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे २३ एप्रिल ते २० मे या कालावधीतील आहेत. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमध्ये ३९, पुण्यात ६, सोलापुरात ६, औरंगाबाद शहरात ४,लातूरमध्ये १, मीरा भाईंदरमध्ये १, ठाणे शहरात १ मृत्यू झाले आहेत. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ३४ पुरुष तर २४ महिला आहेत. आज झालेल्या ५८ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ३० रुग्ण आहेत तर २७ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर १ जण ४० वर्षांखालील आहे. या ५८ रुग्णांपैकी ४० जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या

  • मुंबई : ३०,५४२ (९८८)
  • ठाणे: ४२० (४)
  • ठाणे मनपा: २५९० (३६)
  • नवी मुंबई मनपा: २००७ (२९)
  • कल्याण डोंबिवली मनपा: ८८९ (७)
  • उल्हासनगर मनपा: १८९ (३)
  • भिवंडी निजामपूर मनपा: ८६ (३)
  • मीरा भाईंदर मनपा: ४६४ (५)
  • पालघर:११४ (३)
  • वसई विरार मनपा: ५६२ (१५)
  • रायगड: ४१२ (५)
  • पनवेल मनपा: ३३० (१२)
  • ठाणे मंडळ एकूण: ३८,५८५ (१११०)
  • नाशिक: ११५
  • नाशिक मनपा: ११० (२)
  • मालेगाव मनपा: ७११ (४४)
  • अहमदनगर: ५३ (५)
  • अहमदनगर मनपा: २०
  • धुळे: २३ (३)
  • धुळे मनपा: ९५ (६)
  • जळगाव: २९४ (३६)
  • जळगाव मनपा: ११७ (५)
  • नंदूरबार: ३२ (२)
  • नाशिक मंडळ एकूण: १५७० (१०३)
  • पुणे: ३४० (५)
  • पुणे मनपा: ५०७५ (२५१)
  • पिंपरी चिंचवड मनपा: २६७ (७)
  • सोलापूर: २४ (२)
  • सोलापूर मनपा:५२२ (३२)
  • सातारा: २७९ (५)
  • पुणे मंडळ एकूण: ६५६२ (३०९)
  • कोल्हापूर:२३६ (१)
  • कोल्हापूर मनपा: २३
  • सांगली: ६९
  • सांगली मिरज कुपवाड मनपा: ११ (१)
  • सिंधुदुर्ग: १०
  • रत्नागिरी: १५५ (३)
  • कोल्हापूर मंडळ एकूण: ५०४ (५)
  • औरंगाबाद:२३
  • औरंगाबाद मनपा: १२३३ (४६)
  • जालना: ५६
  • हिंगोली: ११२
  • परभणी: १७ (१)
  • परभणी मनपा: ५
  • औरंगाबाद मंडळ एकूण: १४४६ (४७)
  • लातूर: ६७ (३)
  • लातूर मनपा: ४
  • उस्मानाबाद: ३१
  • बीड: २६
  • नांदेड: १५
  • नांदेड मनपा: ८३ (५)
  • लातूर मंडळ एकूण: २२६ (८)
  • अकोला: ३६ (२)
  • अकोला मनपा: ३६६ (१५)
  • अमरावती: १३ (२)
  • अमरावती मनपा: १५५ (१२)
  • यवतमाळ: ११५
  • बुलढाणा:४० (३)
  • वाशिम: ८
  • अकोला मंडळ एकूण:७३३ (३४)
  • नागपूर: ७
  • नागपूर मनपा: ४६४ (७)
  • वर्धा: ४ (१)
  • भंडारा: १०
  • गोंदिया: ३९
  • चंद्रपूर: १०
  • चंद्रपूर मनपा: ९
  • गडचिरोली: १३
  • नागपूर मंडळ एकूण: ५५६ (८)
  • इतर राज्ये: ४९ (११)

एकूण: ५० हजार २३१ (१६३५)

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘या’ कारणामुळे मुख्यमंत्र्यांसोबतच्या सर्वपक्षीय बैठकीत राज ठाकरे सहभागी झाले नाहीत

News Desk

मुख्यमंत्री एक नंबर काम करत आहेत – अस्लम शेख

News Desk

बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या विनंतीला मान देत पंकजा मुंडेंचा परळी दौरा रद्द

News Desk