HW Marathi
महाराष्ट्र मुंबई राजकारण

‘या’ कारणामुळे भाजपकडून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार

मुंबई | राज्याच्या विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून (१४ डिसेंबर) सुरू होत आहे. दरम्यान, यंदाचे अधिवेशन हे फक्त २ दिवसाचे असल्याने राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपने अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असणाऱ्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. “हिवाळी अधिवेशन दोनच दिवस घेतल्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकत आहे”, असे भाजपचे प्रदेशाअध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या भाजपच्या पत्रकार परिषदेत चंद्रकांत पाटील यांनी हे स्पष्ट केले आहे.

राज्याचे हिवाळी अधिवेशन हे यापूर्वी खरंतर ७ डिसेंबरला घेण्यात येणार होते. मात्र, त्यानंतर हे अधिवेशन १४ डिसेंबर आणि १५ डिसेंबर रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, राज्याचे हिवाळी अधिवेशन हे नागपूरमध्ये घेण्याची प्रथा आहे. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय कामकाज सल्लागार समितीकडून घेण्यात आला आहे. दरम्यान, चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर आता अधिवेशनाच्या या २ दिवसांत सभागृहात नेमके काय काय घडणार ? हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Related posts

मोटरमनच्या ‘त्या’ कृत्याला रेल्वे प्रशासन जबाबदार

News Desk

राधाकृष्ण विखे पाटील आता भाजपला रामराम ठोकणार ?

Gauri Tilekar

बंद लसीकरण केंद्राबाहेर घंटानाद, थाळीनाद करून केंद्र सरकारचा निषेध करणार, नाना पटोलेंचा इशारा

News Desk