HW News Marathi
महाराष्ट्र

तरुणाचा वीजेच्या खांबावर दोन तास धिंगाणा, तारा तोडल्या

जालना : भोकरदन तालुक्यातील पारध बू. येथील एका माथेफिरुने बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास चक्क विजेच्या खांबावर चढून विजेच्या तारा तोडून टाकल्याचा प्रकार उघडकीस आला. संदीप शंकर तबड़े (वय २५) असे या माथेफिरूचे नाव आहे. तो बुधवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास एका विजेच्या खांबावर चढला. या वेळी या खांबावरून वीज प्रवाह सुरू होता. वर चढताच संदीपने मोठ्या आवाजात ओरडून अर्वाच्य भाषेत शिव्या देणे सुरू केले. यावेळी खाली जमलेल्या जमावाने त्यास ख़ाली उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यानंतर त्याने आपले डोके जोरजोरात खांब्यावर आदळण्यास सुरुवात केली.

या बाबत माहिती मिळताच विज कर्मचाऱ्यांनी प्रसंगवधान साधुन तात्काळ वीज प्रवाह बंद केला. वीज प्रवाह बंद केल्या नंतर संदीपने मुख्य विजेच्या तारा तोडून टाकल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी खांबावर चढून त्या माथेफिरूला खाली उतरवले. दरम्यान, तारा तोडल्यामुळे संपूर्ण गावाला रात्र अंधारात काढावी लागली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“पहाटेच्या शपथविधीमुळे फायदा एकच झाला…”, शरद पवारांचा वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा

Aprna

रश्मी शुक्ला यांनी भाजपमध्ये जाण्यासाठी दबाव आणला होता, ठाकरे सरकारमधील ‘या’ नेत्याची कबूली

News Desk

“आता त्यांना ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’च म्हणत बसावे लागेल”, खडसेंचा टोला

News Desk
मुंबई

विमानातून साडेचार कोटीचे सोने जप्त

News Desk

मुंबई | विमानतळावर विमानाच्या सीटखाली जवळपास साडेचार कोटीचे सोने जप्त करण्यात आले आहे. महसूल गुप्तचर संचालनालयाने(डीआरआय)नी शनिवारी ही कारवाई करत तिघांना अटक केली आहे. या प्रकरणात डीआरआयने तीन संशयित प्रवाशांना अटक केले आहे. या तिघांनी आपल्यावरील गुन्हा कबूल केला असून हे सोने लपवण्यासाठी त्यांना पैशाचे आमिश देणयात दिले होते.

इमरान तजनीम, फरहद शेख आणि धर्मेश सोनी असे अटक करण्यात आलेल्या प्रवाशांचे नाव आहे. मोहम्मद नावाच्या वक्तीने त्यांना दुबईमध्ये हे सोने दिले होते. तसेच भारतात जेव्हा हे विमान येईल तेव्हा एक व्यक्ती येऊन ते सोने घेऊन जाईल अशी माहिती अटक करण्यात आलेल्या आरोपींनीकडून माहिती मिळाली आहे.

तसेच हे सोने नेमके कोण आणि कुठे घेऊन जाणार यांची माहिती आरोपींना नव्हती. सोने दिलेल्या व्यक्तीशी निगडीत कोणी तरी या विमानातून मुंबईपर्यत प्रवास करणार असल्याचा संशय डीआरआय अधिकाऱ्यांना होता. हे विमान मुंबईतून अहमदाबाला जाणार होते. सोनी आणि शेख मुंबईतील रहिवासी तर इमरान दिल्लीत राहणार आहे.

Related posts

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी अभियंत्यांवर निलंबनाची कारवाई

News Desk

कामगारांना संघटनांना विश्वासात घ्या; एसटीचा संप मिटवा!: विखे पाटील

News Desk

अनोख्या पद्धतीने वैलेंटाइन डे साजरा

News Desk