HW News Marathi
Covid-19

नाशिकवरून ८४५ लोकांना घेऊन ट्रेन उत्तर प्रदेशला रवाना

नाशिक | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन सुरू आहे. अनेक मजूर, श्रमिक देशात अनेक ठिकाणी अडकले होते. त्यांना त्यांच्या घरी जाण्यासाठी विशेष ट्रेन रवाना करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्रातूनही लखनऊसाठी आज (३ मे) नाशिक रेल्वे स्टेशनवरून लखनऊसाठी ८४५ लोकांना घेऊन ही ट्रेन रवाना झाली आहे.
देशभरात विविध राज्यात अडकलेले प्रवासी, कामगार, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी व इतर लोक लवकरच स्वगृही परतणार आहेत. या सर्वांना आपापल्या घरी पोहचवण्यासाठी कामगार दिनापासून “श्रमिक विशेष” रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. त्यासाठी गृहमंत्रालयाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राजकीय नेत्यांच्या घरी जाऊन लस कोणी दिली? मुंबई हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल

News Desk

मजूरांच्या खर्चाबद्दल केंद्र खोटं बोलतयं – अनिल देशमुख

News Desk

आजपासून देशभरात लसीकरणाला सुरुवात ! मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार राज्यव्यापी लसीकरणाचा शुभारंभ

News Desk