HW News Marathi
महाराष्ट्र

आमदार बाळासाहेब मुरकुटेंचा महावितरण कार्यालयात गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

मुंबई | भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी वीज महावितरणच्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या प्रयत्न केला. मुरकुटेंनी अहमदनगरमधील कृषीपंप वीज तोडणीविरोधात भाजपकडून आक्रमक पवित्रा घेतला होता. या आंदोलनात मुरकुटे देखील सहभागी झाले असून त्यांनी नेवासा वीज वितरण कार्यालयात जाऊन गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

मुरकुटेंना गळफास घेण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना उपस्थित इतर लोकांनी वाचवण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मुरकुटेंच लोकांनी वाचवले आणि सध्या मुरकुटेंची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती मिळाली आहे. जलंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या मतदारसंघात हा प्रकार घडला आहे.

नेमके काय झाले

महावितरण कार्यालयात मुरकुटेंनी तीन तास ठिय्या आंदोलन केले आहे. नेवासे भाजपचं शिष्टमंडळाने शेतकऱ्यांकडून पाच हजार रुपये न घेता तीनच हजार रुपये भरून घ्यावे, अशी मागणी मुरकुटेंनी केली होती. यावेळी मुरकुटेंच्या मागणीला महावितरण कार्यालायतील अधिकाऱ्यांनी दाद दिली नाही. यामुळे मुरकुटे संतप्त झाले होते. यानंतर मुरकुटेंनी महावितरण कार्यलायत मुरकुटे यांनी दोरी लावून गळफास घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुरकुटेंना उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी थांबवले. मुरकुटेंना श्वास रोखला गेल्याचं लोकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या मुरकुटेंची प्रकृती उत्तम असल्याची माहिती मिळाली आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र कर्नाटक सीमाभागात मराठी माणसांच्या समस्या सोडविल्या जातील! – मुख्यमंत्री

Aprna

पायाभूत सुविधा आणि विकास प्रक्रियेची कामे थांबणार नाहीत! – अजित पवार

Aprna

इंदूमिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक निर्धारित वेळेत पूर्ण होईल! – धनंजय मुंडे

Aprna