HW News Marathi
महाराष्ट्र

देवेंद्र फडणवीसांनी घेतली राज ठाकरेंची भेट; राजकीय चर्चा झाल्याची शक्यता

मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजे ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ या नव्या निवासस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दाखल झाले. फडणवीस पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह आज (२४ नोव्हेंबर) राज ठाकरेंच्या निवासस्थानी गेले होते. राज ठाकरे आणि फडणवीस या दोघांमध्ये राजकीय चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज ठाकरेंनी नुकतेच कृष्णकुंज या त्यांच्या जुन्या निवासस्थानावरून शिवतीर्थ नव्या निवास्थानी राहायला गेले आहेत. राज ठाकरेंचे नवे घर हे त्यांच्या जुन्या घराच्या अगदी शेजारीच आहे. राज ठाकरे नव्या घरी राहायला गेल्यानंतर राजकीय नेत्यांनी भेट दिली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत सपत्नीक राज ठाकरेंच्या घरी त्यांच्या मुलीच्या विवाहचे निमंत्रण देण्यासाठी गेले होते. यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी देखील राज ठाकरेंचे नव्या घरी भेट घेतली आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी दिवाळीला राज यांची सदिच्छा भेट घेतली.

बीएमसी निवडणुकीत एकत्र येणार का ?

आगामी काळात बीएमसी निवडणुका होणार आहेत. तसेच बीएमसी निवडणुकीत मनसे आणि भाजप एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्यात सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नवर परिवहन मंत्री अनिल परब, भाजप नेते गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत आणि एसटी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ यांच्या गेल्या दोन तासांपासून चर्चा सुरू आहे. या भेटीदरम्यान कोणत्या राजकीय विषयावर चर्चा झाली. यावर आता तर्कवितर्क काढले जात आहेत.

 

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

परशुराम घाट पुन्हा बंद होणार; ग्रामस्थांचा तीव्र विरोध

Chetan Kirdat

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राजीनामा देणार?

swarit

लोकसभा आणि विधानसभेमध्ये चुकलात तशी चुक पुन्हा करु नका- अजित पवार

swarit