HW News Marathi
महाराष्ट्र

पहिल्यांदा माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकाच मंचावर, अर्धा तास रंगल्या गप्पा

सोलापूर | राज्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्यातनंतर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार पहिल्यांदाच एकत्र दिसले. करमाळा मतदारसंघाचे अपक्ष आमदार संजय शिंदे यांच्या मुलाचे लग्न काल (८ डिसेंबर) माढ्यात पार पडले. या लग्नात देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार शेजारीच बसले होते. दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चांगल्याच गप्पा रंगल्या होत्या. लग्नात दोघांच्या गप्पांची दृष्टवरून पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने उद्धव ठाकरे हे राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होणार हे निश्चित झाले होते. यानंतर अजित पवारांनी राष्ट्रवादीसोबत बंडखोरी करत भाजपशी हात मिळविणी करत शनिवारी (२३ डिसेंबर)च्या सकाळी ८ वाजता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यानंतर राज्याच्या राजकारणाने वेगळे वळण घेतले होते.

दरम्यान अजित पवारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला गेला. यानंतर अखेर २६ नोव्हेंबर रोजी दुपारी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. फडणवीसांकडे पुरेस बहुमत नसल्याने त्यांनी मुख्यमंत्री पदाता राजीनामा दिला. या सर्व राजकीय हायव्होल्टेज नाट्यानंतर काल अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस एकाच मंचावर आले होते.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

जलयुक्त शिवार योजनेत सहभागी असलेल्या त्यांची पण चौकशी होणार का?

News Desk

आजचा कृषिदिन हा शेतकऱ्यांसाठी काळा दिवस – संजय राऊत

News Desk

ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेत पुणे परिसराची महत्त्वाची भूमिका राहील! – देवेंद्र फडणवीस

Aprna