HW News Marathi
महाराष्ट्र

आरे मेट्रो कारशेडच्या स्थगिती, शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच !

मुंबई | उद्धव ठाकरे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. “आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती,” देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, “मेट्रोच्या कामला स्थगिती दिली नाही, हे देखील मुख्यमंत्र्यांनी नमुद केले आहे. नव्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाविरोधात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट करत महाविकासआघाडीच्या सरकारवर टीका केली आहे.

यावर फडणवीस ट्वीटमध्ये म्हटले की, “सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कार शेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच,” असे म्हटले आहे.यानंतर फडणवीस यांनी दुसरे ट्वीटमध्ये म्हटले की, “जपानच्या जायकाने अत्यल्प व्याजदराने सुमारे १५,००० कोटी रुपयांचे कर्ज या मेट्रो प्रकल्पासाठी दिले होते. अशा पद्धतीच्या निर्णयांनी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी भविष्यात गुंतवणूकदार पुढे येणार नाहीत आणि १५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील”, असे म्हणत त्यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

आरेतील एक पानही तोडले जाणार नाही !

आरेमधील मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिली आहे. मात्र, मेट्रोच्या कामला स्थगिती दिली नाही, असे देखील मुख्यमंत्र्यांनी नमुद केले आहे. जोपर्यंत या कामाची चौकशी होऊन पर्यायी मार्ग निघत नाही तोपर्यंत आरेतील आता एक पानही तोडले जाणार नाही, असे वचन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. मुंबईतील विधिमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘मुख्यमंत्री सहायता निधी’ला दोन दिवसांत १२ कोटी ५० लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्र्यांनी मानले आभार

swarit

बारवी धरणप्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या देण्याचे आदेश महापालिकांना एप्रिल अखेरची मुदत

News Desk

ग्रंथालय सुरु करण्याच्या बाबतीत २ दिवसांत निर्णय घेणार, राज ठाकरेंच्या एका फोनचा इम्पॅक्ट!

News Desk