HW News Marathi
महाराष्ट्र

ग्रंथालय सुरु करण्याच्या बाबतीत २ दिवसांत निर्णय घेणार, राज ठाकरेंच्या एका फोनचा इम्पॅक्ट!

मुंबई | कोरोनाच्या या संकट काळात अनेक जण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी जाऊन भेट घेत आहेत. आपले प्रश्न, अडचणी त्यांच्यासमोर मांडत आहेत. अनलॉमध्ये हळूहळू निर्बंध शिथिल केले जात आहेत. मात्र, राज्यातील ग्रंथालंय सुरू करण्यास मात्र सरकारनं अद्यापही परवानगी दिलेली नाही. राज्यातील ग्रंथालयं सुरू करावी, या मागणीसाठई ग्रंथालय प्रतिनिधींनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी त्यांनी भेट घेतली.

या भेटीदरम्यान ग्रंथालयाच्या प्रतिनिधींनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्या समस्या मांडल्या. त्यानंतर राज ठाकरे यांनी त्वरित उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याशी फोनवर चर्चा केली. तसंच चर्चेदरम्यान सामंत यांनी लवकरात लवकर राज्यातील ग्रंथालयंदेखील सुरू करण्यात येतील आणि दोन दिवसात यावर निर्णय घेतला जाणार असल्याचं आश्वासन राज ठाकरे यांना दिले आहे.

 

पुस्तकांमुळे ऊर्जा मिळते आणि वैचारिक आनंदही मिळतो. सध्याच्या करोना महासाथीच्या काळात त्याची नितांत आवश्यकता आहे. लॉकडाउनमध्ये बंद करण्यात आलेली ग्रंथालयं पुन्हा सुरू करावी. तसंच यावर अंवलंबून असलेल्या अर्थचक्राला गती मिळेल, असं म्हणणं प्रतिनिधींनी राज ठाकरेंसमोर मांडले होते. या आधी हॉटेल चालक, मुंबईचे डबेवाले, डॉक्टर्स, जिमचे चालक , कोळी भगिनी हे देखील आपल्या मागण्यांसह राज ठाकरे यांच्या भेटीसाठी दाखल झाले होते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“…तर त्यांनी शेतकऱ्यांसाठी कोणत्याही शेतकरी नेत्यापेक्षा जास्त काम केले आहे” – जेपी नड्डा

News Desk

शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याचे राज्य व देशभर पडसाद; राष्ट्रवादीने केले काळ्यापट्टया बांधून मूक आंदोलन

News Desk

नारायण राणेंना शिवसेनेत ठेवलेत, तर मी आणि रश्मी घर सोडून जाईन !

News Desk