HW News Marathi
महाराष्ट्र

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या छातीत दुखू लागल्याने KEM रुग्णालयात दाखल

मुंबई | राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना केईएम रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी देशमुखांचा रक्तदाब वाढ आणि छातीत दुखणे यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले असून देशमुखांवर डॉक्टर चाचणी करणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मुंबईमधील बार आणि रेस्टॉरन्ट्सकडून दर महिन्याला १०० कोटी रुपये वसूल करण्यात यावे, अशा आदेश देशमुखांनी दिला होता. या वसुलीची जबाबदारी देशमुखांनी सचिन वाझेंवर सोपवली होती, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पत्राद्वारे केला होता. या प्रकरणी देशमुखांना नोव्हेंबर २०२१ मध्ये ईडीने अटक केली होती.

देशमुखांना २५ मे रोजी ‘स्ट्रेस थॅलियम हार्ट टेस्ट’साठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. देशमुखांना मे महिन्याच्या सुरुवातीला त्यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया करण्यात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. परंतु, देशमुखांनी खासगी रुग्णालयातील शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्याची याचिका फेटाळून लावली होती. यानंतर देशमुखांना जेजे रुग्णालयात उपचार करण्याचे आदेश दिले होते.

 

नेमके काय आहे प्रकरण

देशातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान अँटिलियाच्या बाहेर स्फोटकाने भरलेली कार सापडल्याने एकच खळबळ उडाली. स्कॉर्पिओ कारमध्ये स्फोटकं ठेवली होती त्या कारचा मालक मनसुख हिरेन याच्या हत्येमागे पोलीस अधिकारी सचिन वाझे याचा हात असल्याचे समोर आली होती. या घटनेनंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची बदली करण्यात आली. यानंतर देशमुखांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना १०० कोटीची वसुली केल्याचा आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास ईडी करत असून या प्रकरणी ईडीने देशमुखांच्या घर आणि कार्यालयावर छापे टाकले होते. देशमुखांनी ईडीची अटक टाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याचिका दाखल केली होती. परंतु, न्यायालयाने देशमुखांची याचिका फेटाळून लावली. यानंतर देशमुख हे ईडीच्या कार्यालयात हजर झाले होते. आणि ईडीने चौकशी केल्यानंतर देशमुखांना अटक केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मोदी सरकारला शेतकऱ्यांवरील अत्याचाराची जबाबदारी टाळता येणार नाही!;” बाळासाहेब थोरात

News Desk

वडेट्टीवार यांच्या विरोधात लढलेले शिवसेना उमेदवार काँग्रेसमध्ये दाखल

News Desk

तासगाव शहर अतिक्रमणाच्या विळख्यात

News Desk