HW News Marathi
महाराष्ट्र

एकनाथराव खडसे व रोहिणीताईं पासून माझ्या जीवाला धोका; शिवसेनेच्या आमदाराचा गंभीर आरोप

मुंबई। माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे आणि त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचा गंभीर आरोप काल (२५ डिसेंबर) मुक्ताईनगरचे आमदार तथा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा पोलीस अधिक्षकांची भेट घेऊन तक्रार केली. याप्रसंगी पत्रकारांशी बोलतांना त्यांनी खडसे पिता-पुत्रीवर गंभीर आरोप केले. तर भाजप आणि शिवसेनेतील युतीत एकनाथराव खडसे यांनी फूट पाडली असून आता महाविकास आघाडीतही तेच फूट पाडणार असल्याचा आरोप देखील त्यांनी केला.

शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये बोदवड नगरपंचायतींच्या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. या दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये काल (२५ डिसेंबर) मुक्ताईनगरमध्ये वाद झाला होता. या वादानंतर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात बोलताना जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर म्हणाल्या, “शिवसैनिकांनी काल रात्री महिलांचा विनयभंग करून धमकावले. आपण त्या ठिकाणी गेलो असता ते आमच्या अंगावरही धावून आले. हा सर्व प्रकार पोलिसांसमोर घडलेला आहे. तर बोदवड येथे देखील माझ्या अंगावर शिवसेनेचे पदाधिकारी धावून आले होते. यामुळे मतदारसंघात दहशतीचे वातावरण असून महिला सुरक्षीत नसल्याचा प्रति आरोप त्यांनी केला आहे. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गुरुपौर्णमेनिमित्त पंकजा मुंडे यांनी त्यांच्या गुरूंचे केले स्मरण

News Desk

१ जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरू झालाच पाहिजे ! व्यापारी संघटनांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

राज्यपालांना शिफारस केल्यानंतर; आज विधानभा अध्यक्षाची निवड होणार का?

Aprna