HW News Marathi
महाराष्ट्र

माजी मंत्री गुलाबराव देवकरांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा मार्ग झाला सुकर!

जळगाव। जळगावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा आता मार्ग सुकर झाला आहे. धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकर यांना दिलेल्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाची आता स्थगिती मिळाली आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत विरोधी उमेदवाराने गुलाबराव देवकर यांच्या विरोधात दाखल केलेली याचिका देखील न्यायालयाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता गुलाबराव देवकर यांचा जिल्हा बँकेच्या अध्यक्ष पदाचा मार्ग अतिशय सुकर झाला आहे.

अध्यक्षपदाचा रांगेतला मार्ग मोकळा

राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांनी नुकताच जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मोठा विजय मिळवला आहे. मात्र, दुसरीकडे घरकुल प्रकरणात धुळे न्यायालयात सुरु असलेल्या खटल्याबाबत जिल्हा बँकेच्या संचालक निवडणुकीत गुलाबराव देवकर यांच्या निवडीवर मात्र पराभवाची टांगती तलवार होती. धुळ्याच्या विशेष न्यायालयाने घरकुल प्रकरणात गुलाबराव देवकर यांना दिलेल्या शिक्षेस मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने आणि त्यांच्या जिल्हा बॅंकेच्या उमेदवारी अर्जावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्याबाबत न्यायालयाने या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास नकार देऊन याचिका फेटाळून लावल्याने राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचे जिल्हा बँकेचे संचालक पद अबाधित झाले असून जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी देखील त्यांचे नाव चर्चेत असल्याने यांच्या अध्यक्षपदाचा रांगेतला मार्ग मोकळा झाल्याने जल्लोषाचे वातावरण देवकर समर्थकांमध्ये यावेळी निर्माण झालं होतं.

याचिका फेटाळून लावली आहे

याबाबत माहिती देताना देवकर यांचे वकील महेश देशमुख यांनी सांगितले की, न्यायालयाने हस्तक्षेप करण्यास नकार देवून याचिका फेटाळून लावली आहे. यात घरकुल प्रकरणात विशेष न्यायालयाने दिलेल्या निकाल पत्रात देवकर यांच्यावर केवळ दोन परिच्छेद दिले असून त्यात त्यांनी म्हटले आहे की, देवकर यांचा या प्रकरणात थेट सहभाग दिसून येत नाही. त्यांनी कोणत्याही धनादेशावर सह्या केल्या नाहीत, तसेच त्यांना कोणत्याही प्रकारे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष फायदा झाल्याचे दिसून येत नसल्याचा मुद्दा देवकर यांच्या वकिलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिला. हे सगळे दावे मान्य करत न्यायालयाने देवकर यांच्या बाजूने निकाल देत याचिका फेटाळून लावली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोलीस दलाचं खच्चीकरण, गृहमंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्या, फडणवीसांची मागणी  

News Desk

मी पाटील आहे, राऊतांपेक्षा भयानक बोलू शकतो, पण …! – चंद्रकांत पाटील

Aprna

विधान परिषदेच्या ‘या’ दहा सदस्यांना निरोप

Aprna