HW News Marathi
Covid-19

इंदापूरमध्ये बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी करूनच तालुक्यात घेण्यात यावे !

मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. मात्र, इंदापूर तालुक्यात येणारे बाहेरील लोक यांची तपासणी करूनच त्यांना तालुक्यात घेण्यात यावे अन्यथा मोठा अनर्थ घडू शकतो, असे मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हणाले होते. त्याचबरोबर त्यांनी पत्रकार परिषदेत सर्व पत्रकारांना विनंती केली होती. की ही परिस्थिती गांभीर्यपूर्वक दाखवावी. इंदापूर तालुक्यामध्ये एकही कोरोना चाचणी होत नाही. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत नाहीत, इंदापूर तालुक्यातील महत्त्वाच्या गावांमध्ये कोरोना चाचणी घेण्यात करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.

तसेच इंदापूर प्रशासनाची सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी इंदापूर तालुक्यात तपासणी केल्यास अधिकचे रुग्ण आढळून येतील अशी शंका उपलब्ध केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी इंदापूर मधील पाच संशयित यांना तपासणीसाठी पाठवले असता त्यातील दोन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत तर आणखी दोन रिपोर्ट येणे बाकी आहे ,या मुळे इंदापूर शहर परिसरामध्ये नागरिकांनी प्रशासनाला साथ देण्याची गरज असून त्यामुळे आपले कुटुंब सुरक्षित राहणार आहे.

इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील चार तर इंदापूर शहरमधून एक रेडझोनमध्ये परतलेल्या या पाच ही संशियीत रूग्णांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले होते. यातील चार रुग्ण मुंबई शहरातून आले होते. या रुग्णांच्या मुंबई येथील घरातचे कोरोनाचे रुग्ण आढळल्याने असून त्या सर्वांवर मुंबईतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. या कारणास्तव या व्यक्तींपासून इंदापूरकरांना कोणताही धोका नको. म्हणून प्रशासनाने मुंबईहून इंदापूरमध्ये दाखल झालेल्या चार व्यक्ती व पुणे येथून दाखल झालेली एक व्यक्ती अशा पाचही व्यक्तींना इंदापूर शहरतील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहात आयसोलेशनमध्ये निरीक्षणाखाली ठेवले होते.

या व्यक्तींना कोरोनाची लागण आहे की नाही याची खात्री करण्यासाठी यापैकी चार व्यक्तींचे घशातील स्त्रवाचे नुमणे इंदापूर प्रशासनकडून गुरुवारी (१४ मे) रात्रीच घेण्यात आले तर एकाचा नमुना शुक्रवारी (१५ मे) घेण्यात आला होता व पुणे येथे चाचणीसाठी पाठवण्यात आला असल्याचे प्रशासना ने सांगितले होते. यापैकी एकाच कुटुंबातील तिघांचा रिपोर्ट आला असून त्यामध्ये आई व मुलगी पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले आहे आणखी दोन रिपोर्ट येणे बाकी आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अयोध्येत रामनवमीला राम जन्मभूमीत भक्तांना जाण्यास बंदी, घरीच रामजन्मोत्सव साजरा करण्याचं आवाहन 

News Desk

ग्रामीण भागातील विद्यापीठांमध्ये ऑनलाइन परीक्षा घेणे कठीणच !  

News Desk

कोवीड -19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हा स्तरावर टास्क फोर्स

News Desk