HW News Marathi
महाराष्ट्र

११ वेळा आमदार राहीलेले शेकापचे माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे निधन …

सांगोला | वयोमानामुळे विधानसभा निवडणूक लढविणे शक्य नव्हतं म्हणुन शेकापने दुसरा उमेदवार बघावा असे सांगत सलग 11 वेळा दुष्काळी सांगोला विधानसभेचे प्रतिनिधित्व केलेले शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार गणपतराव देशमुख यांनी आज अखेरचा श्वास घेतला आहे.

55 वर्षे आमदारकी,विधिमंडळाचं विद्यापीठ

विधिमंडळाचे विद्यापीठ म्हणुन ओळख असलेले 94 वर्षीय गणपतराव देशमुख यांनी तब्बल 55 वर्षे सांगोला मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तर 93 व्या वर्षी गणपतरावांना डोळे आणि कान साथ देत नसल्यामुळे निवडणूक न लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. गणपतराव देशमुख यांनी 1962 साली पहिली निवडणुक लढवली होती. त्यानंतर आजवर 11निवडणुका सांगोला विधानसभा मतदारसंघातून गणपतराव जिंकत आले आहेत.देशमुख यांची प्रकृती काही दिवसांपूर्वीच बिघडल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. गणपतरावांच्या प्रकृतीसाठी सांगोला तालुक्यातील तरुणांनी शिवलिंगाचा दुधाने अभिषेक करून आयुष्य व आरोग्य चांगले राहावे अशी प्रार्थना देखील केली होती.

पक्षांतराच्या गर्दीत पक्षनिष्ठ नेता

भारतीय जनता पक्षामध्ये सत्तरी पार केलेल्या उमेदवारांना ब्रेक दिला जात होता आणि त्यामुळे अनेक वयस्कर उमेदवारांना घरचा रस्ता धरावा लागत होती मात्र याला संपूर्ण देशात अपवाद ठरले होते, ते ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख .अनेकांची पक्षांतर होत असताना आबा मात्र पक्षनिष्ठ राहिले.वयाची नव्वदी पार केलेल्या या 94 वर्षांच्या तरुणाची क्रेझ आजपर्यन्त सांगोला मतदारसंघात पाहायला मिळत मिळालीये.गणपतरावांनी निवडणुकीतून माघार घेऊनही ‘आबासाहेब फिरसे’ असा नारा कार्यकर्तेच नाही, तर प्रत्येक मतदार देत होते. आमदार गणपतराव देशमुख यांनी तब्बल अकरा वेळा आमदार होण्याचा मान मिळवत विश्वविक्रम रचला होता .

देशमुख 1962 मध्ये पहिल्यांदा आमदार झाले. 1972 आणि 1995 चा अपवाद वगळता, ते सातत्याने विजयी झाले आहेत. गणपतरावांच्या या विजयामुळे शेतकरी कामगार पक्षाची ताकद सांगोला मतदारसंघात मोठी होती. तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी दहा वेळा विजयी झाले होते. 2009 च्या निवडणुकीत विजय मिळवून करुणानिधी यांच्या पाठोपाठ दहाव्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकणारे देशमुख हे देशातले दुसरे आमदार ठरले होते. 2014 मध्ये त्यांनी हा विक्रम मोडित एकमेवाद्वितीय होण्याचा मान पटकावलेला होता.

आबा…जनसामान्यांचे लाडके !

अत्यंत साधी राहणी असलेल्या गणपतरावांनी तब्बल 54 वर्षे सांगोल्याचे प्रतिनिधित्व केले आहे. 2012 मध्ये आमदार म्हणून विधानसभेतील त्यांच्या सहभागास 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सभागृहाने तसेच सरकारने त्यांचा गौरव देखिल केला होता.गणपतराव देशमुख हे बहुतांश काळ विरोधी बाकांवरच होते, मात्र 1978 मध्ये शरद पवार यांनी पुलोद सरकार स्थापले तेव्हा आणि 1999 मध्ये शेकापने काँग्रेस आघाडी सरकारला पाठिंबा दिला तेव्हा, अशा दोन वेळा गणपतराव देशमुख यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला होता.एक पक्ष एक व्यक्ती एक मतदारसंघ म्हणून सांगोला विधानसभा मतदारसंघाला ओळखले जाते आणि याच मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख हे विजयी होत आलेले आहेत . सर्वाधिक वेळा विधानसभेत निवडून जाण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. अशा नेत्याला महाराष्ट्र मुकला आहे….!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पवारांचा नातू अपरिपक्व नाही हे वारंवार सिद्ध होतंय!

News Desk

कॉंग्रेस-राष्ट्रवादीला राज्यपालांनी सत्तास्थापनेचे निमंत्रण द्यावे !

News Desk

भोकर, बेंबर संयुक्त वन व्यवस्थापन समितीला ” संत तुकाराम वन ग्राम पुरस्कार “

News Desk