HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमधील कायदा व सुव्यवस्थेबाबत लक्षवेधी मांडणारे आमदार संदीप क्षीरसागर यांचाच अवैध धंद्यांमध्ये छुपा सहभाग

बीड । बीड जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था याविषयी सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात लक्षवेधी मंडणारे बीड चे राष्ट्रवादी काँग्रेस चे आमदार संदीप क्षीरसागर हेच अवैध धंद्याचे मास्टर असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा बीड च्या जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी थेट मुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्याकडे लिखित तक्रार केली आहे.

याच आमदाराच्या विरोधात गेल्या महिन्यात काळ्या फिती लावून आंदोलन करून गंभीर स्वरूपाचे आरोप ही केलेल्या शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखांनी परत एकदा आमदार संदीप क्षीरसागर यांची थेट तक्रार मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रार करून बीड जिल्ह्यात खळबळ उडवली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत लक्षवेधी मांडणारे आमदार संदीप क्षीरसागर यांचाच अवैध धंद्यांमध्ये छुपा सहभाग आहे. त्यामुळे पोलिसांवर दबाव राहावा म्हणून त्यांनी ही लक्षवेधी मांडण्यात आल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी केला आहे. याबाबत त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे नुकतीच तक्रार करून बीड जिल्ह्याची नाहक बदनामी होत असल्याचे म्हटले आहे.

निवेदनात सचिन मुळूक याची पुढे म्हटले आहे की, दि.२९ मार्चपासून आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू होणार आहेत. या अनुषंगाने क्रिकेट सट्टा विरोधात बीड पोलिसांनी कारवाई मोहीम हाती घेतली होती. ही मोहीम थांबविण्यासाठी बीड पोलिसांवर दबाव आणला जात आहे. आमदार संदीप क्षीरसागर यांच्या विनंतीला दाद देण्यात न आल्याने त्यांनी पोलिस प्रशासनाच्या विरोधात तक्रारी सुरू केल्या. सट्टा लावणारे व घेणारे लोक आमदार संदीप क्षीरसागर यांच्याच सानिध्यातील आहेत. तसेच, त्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सभागृहात खाजगी सावकारकी विरोधात भाष्य केले. परंतु मतदारसंघात खाजगी सावकारकी करून पैसे वसूल करणारे खाजगी सावकार आमदार संदीप क्षीरसागर यांचे मित्र व खंदेसमर्थक आहेत. या सावकारांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार आल्यानंतर क्षीरसागर हेच कारवाई होऊ देत नाहीत. पोलिसांनी त्यांच्या दबावात रहावे यासाठी त्यांनी लक्षवेधी उपस्थित करून पोलिसांवर आरोप केले. तसेच, अवैध वाळू उपसा संदर्भात यांनी केलेले वक्तव्य हे हास्यास्पद आहे. त्यांचे समर्थक असलेले माजी आमदार सय्यद सलीम यांच्या भावाच्या नावे दोन वाळूचे ठेके आहेत. ते मिळवून देण्यासाठी क्षीरसागर यांनी पाठपुरावा केलेला आहे. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाविरोधात कारवाई झाली की कारवाई न करण्यासाठी व वाहन सोडण्यासाठी क्षीरसागर हे पोलिस व महसूल प्रशासनाला फोन करतात. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गुंड प्रवृत्तीचे लोक आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासोबत उघडपणे फिरताना दिसून येतात.

हे सर्वसामान्यांना ज्ञात आहे. सर्व प्रकारच्या अवैध धंद्यात यांचे समर्थक व स्वतः आहेत, त्यांनीच बेजबाबदारपणाने लक्षवेधी उपस्थित करून बीड जिल्ह्याची नाहक बदनामी केली. यावरून ते अकार्यक्षम लोकप्रतिनिधी ठरले आहेत. यापूर्वी देखील त्यांनी शिवसैनिकांच्या प्रत्येक कामात सातत्याने अडथळे निर्माण करून त्रास दिला आहे. या विषयाची गंभीर नोंद घ्यावी, अशी विनंती ही शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी निवेदनात केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी करतात. ते तसं का करतात, मला अजून कळलं नाही”, पटोलेंचा मुनगंटीवारांवर पलटवार 

News Desk

  “कर दहशतवाद पूर्णपणे संपवण्याचं काम या बजेटनं केलं”, फडणवीसांची प्रतिक्रिया  

News Desk

मुख्यमंत्र्यांकडून लॉकडाऊन वाढवल्यासंदर्भात अधिसूचना जाहीर

News Desk