HW Marathi
महाराष्ट्र राजकारण

गडकिल्ले लग्न, सभारंभांसाठी भाड्यावर देणार नाही, पर्यटन विभागाचे स्पष्टीकरण

मुंबई | राज्यातील २५ ऐतिहासिक किल्ल्याचे लग्न आणि सभारंभासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हेरिटेज टुरिझम’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळकडून (एमटीडीसी) राज्यातील २५ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. गडकिल्ले भाडेतत्त्वावर देण्याचा राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयावर राज्यभरात संताप व्यक्त केला जात आहे. राज्या सरकारने यासंदर्भात स्पष्टीकरण ते म्हटले की, राज्यात राज्यात दोन प्रकारचे किल्ले आहेत. एक वर्ग १ आणि दुसरे वर्ग २. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाशी संबंधित आणि अन्य ऐतिहासिक संदर्भ असलेले किल्ले हे वर्ग १ मध्ये येतात आणि अन्य सुमारे ३०० किल्ले हे वर्ग २ मध्ये येतात.

वर्ग १ मधील किल्लेंचा समावेश

वर्ग १ चे किल्ले हे संरक्षित वर्गवारीत येतात. केंद्र आणि राज्य सरकारचा पुरातत्त्व विभाग या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहे आणि त्या किल्ल्यांच्या विकासाचा स्वतंत्र कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यामुळे ऐतिहासिक वारसा म्हणूनच ते जतन करण्यात येतील. छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा साम्राज्याशी संबंधित किल्ले हे कुठल्याही परिस्थितीत ऐतिहासिक अर्थानेच जपले जातील आणि त्याचे पावित्र्य तसेच कायम राखले जाईल.

वर्ग २ मधील किल्लेंचा समावेश

तसेच वर्ग २ चे किल्ले हे असंरक्षित वर्गवारीत येतात. त्याचा पर्यटन विकासासाठी ऐतिहासिक स्थळे म्हणून विकास करण्याचा निर्णय राज्य सरकारतर्फे घेण्यात आला आहे. त्यामुळे हे किल्ले लग्नासाठी, समारंभांसाठी भाड्याने देण्याचा प्रश्नच उदभवत नाही. एका वर्तमानपत्राच्या बातमीच्या आधारे कृपया चुकीचे अर्थ काढण्यात येऊ नये, असे स्पष्टीकरण पर्यटन विभागाच्या सचिव विनीता सिंगल यांनी दिले आहे.

नेमके प्रकरण काय आहे?

राज्यातील २५ ऐतिहासिक किल्ल्याचे हेरिटेज हॉटेलिंग आणि लग्नसभारंभासाठी उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हेरिटेज टुरिझम’ला चालना देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळकडून (एमटीडीसी) राज्यातील २५ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.  या निर्णयामुळे विरोधकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी बांधलेल्या गडकिल्ल्यांचे जतन करण्याऐवजी त्यांचे हॉटेलमध्ये रुपांतर करणे हे दुर्दैवी असल्याच्या प्रतिक्रिया सर्व स्तरातून येऊ लागल्या आहेत.

‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्राने यासंदर्भात बातमी दिली आहे. या ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तपत्रानुसार स्थानिक पर्यटकांमध्ये हेरिटेज टुरिझम अर्थात  गडकिल्ले, ऐतिहासिक वास्तू यांच्या पर्यटनास वाव मिळणार आहे. यामुळे राज्य सरकारने हा निर्णय घेतला असून पर्यटन क्षेत्रात खाजगी गुंतवणूक वाढवण्यासाठी किल्ल्यांचे रुपांतर हेरिटेज हॉटेलमध्ये करण्याची तयारी सरकारने केली आहे. महाराष्ट्रातील गड किल्ले हेरिटेज हॉटेलियर्स आणि हॉस्पिटॅलिटी चेन्सना भाडेतत्त्वावर दिले जाणार आहेत.

 

 

Related posts

#MaharashtraResult2019 : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भोकरमधून विजयी

News Desk

रेशन दुकानावर साखर मिळणार नाही!

News Desk

राज्यात लवकरच दुधाच्या प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी

News Desk