HW Marathi
महाराष्ट्र

छत्तीसगडमधील कांकेर येथे नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत बीएसएफचे ४ जवान शहीद

रायपूर | छत्तीसगडमधील कांकेर येथे गुरुवारी (४ मार्च) बीएसएफ जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत बीएसएफचे ४ जवान शहीद झाले असून अन्य २ जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना पखांजूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालावा यासाठी नक्षलवाद्यांकडून येथील लोकांना सतत भीती दाखविण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर नक्षलवाद्यांकडून ही चकमक घडविण्यात आली आहे.

नक्षलवादविरोधी ऑपरेशनचे डीआयजी सुंदराज यांनी या चकमकीत ४ जवान शहीद झाल्याची माहिती दिली आहे. आगामी लोकसभा निवडणुकांवर बहिष्कार घालण्यासाठी नक्षलवाद्यांकडून सामान्य लोकांना धमकाविण्यात येत आहे. पंखाजूर भागात निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा नक्षलवाद्यांनी दिला आहे.

Related posts

जिल्हाधिकारी डोंगरे यांनी नायगाव व बिलोली तालुक्यातील जलयुक्त शिवार अभियांतर्गत विविध कामांची पहाणी केली

News Desk

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार मुहूर्ताची वाट का बघत आहे ?

Gauri Tilekar

धरणे आंदोलनात शेकडो पत्रकारांचा सहभाग 

News Desk