मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच चालला असल्याचे चित्र आहे. गेल्या काही तासांतच राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ३३ वरून थेट ३७ वर जाऊन पोहोचला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे. पुणे-पिंपरी-चिंचवड १६, मुंबई – ८, यवतमाळ – २, नवी मुंबई – ३, नागपूर – ४, औरंगाबाद १, अहमदनगर १, ठाणे – १, कल्याण – १ असे राज्यात एकूण ३७ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर ९५ वर कोरोना संशयित रुग्णांना भरती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, देशातील कोरोना रुग्णांची संख्या ११० वर गेली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ३१ मार्चपर्यंत शाळा-कॉलेज बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Maharashtra Health Ministry: Four more people have been tested positive for #coronavirus in Mumbai and Navi Mumbai, taking the total number of cases to 37 in the state. pic.twitter.com/HQeCscEj0C
— ANI (@ANI) March 16, 2020
सविस्तर वृत्त लवकरच…
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.