HW Marathi
महाराष्ट्र

छत्तीसगडमधील सुकमा येथील चकमकीत ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान

रायपूर | छत्तीसगडमधील सुकमा येथे मंगळवारी (२६ मार्च) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत ४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यास सुरक्षा दलाच्या सुरक्षा दलाच्या जवानांना यश आले आहे. सुकुमा जिल्ह्यातील जागरगुंडा भागात ही चकमक झाली आहे. दरम्यान, या नक्षलवाद्यांकडे असलेला शस्त्रसाठा देखील जप्त करण्यात आल्या असून या चारही नक्षलवाद्यांचे मृतदेह जवानांनी ताब्यात घेतले आहेत.

कोबरा २०१ बटालियनच्या कमांडोजकडून शोधमोहीम सुरु असताना काही नक्षलवाद्यांनी त्यांच्या दिशेने गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून जवानांनी केलेल्या गोळीबारात ४ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडील शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यात १ रायफल आणि २ थ्री नॉट थ्री रायफल्सचा समावेश आहे.

काहीच दिवसांपूर्वी दंतेवाडा जिल्ह्यात नक्षलवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत सीआरपीएफचे ५ जवान जखमी झाले असून १ जवान शहीद झाला आहे. यावेळी नक्षलवाद्यांकडून आयईडी स्फोट घडविण्यात आला होता. या स्फोटानंतर नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर गोळीबारही करण्यात आला होता. यावेळी सुरक्षा दलाच्या जवानांकडून प्रत्युत्तर देण्यात आले होते.

Related posts

डहाणू-सांगलीतील मृत विद्यार्थिनींच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री निधीतून मदत

Ramdas Pandewad

आमचा पक्ष जातीयवादी नाही- जयंत पाटील

अमित शहा मुंबईत दाखल, मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत