HW News Marathi
Covid-19

धनंजय मुंडेंकडून ऊसतोड कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वाटप

बीड | बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्ह्यात परतलेल्या ऊसतोड मजुरांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेच्या स्वनिधीमधून आता जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांना २८ दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीसाठी म्हणून जीवनावश्यक किराणा साहित्य मोफत वाटप करण्यात येणार आहे. यासाठी प्राथमिक स्वरूपात १ कोटी ४३ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, ग्रामविकास विभागाने यास विशेष बाब म्हणून तांत्रिक मान्यताही दिली आहे. या मजुरांची व त्यांच्या कुटुंबियांची परवड होऊन नये या उद्देशाने धनंजय मुंडेंनी हा निर्णय घेण्याबाबत जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना निर्देशीत केले होते. आतापर्यंत नोंदणीकृत जिल्ह्यात आलेल्या तसेच अजूनही परत यायला सुरूच असलेल्या हजारो ऊसतोड मजुरांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याची माहिती मिळत आहे.

ऊसतोडणीसाठी गेलेल्या ऊसतोड मजुरांना राज्य शासनाने आपापल्या गावी परतण्यासाठी परवानगी दिली. त्यांना आपल्या गावी सुरक्षा व खबरदारीचा उपाय म्हणून २८ दिवसांसाठी अलगिकरणात ठेवण्यात येत आहे. तर आता या ऊसतोड मजुरांना मदत म्हणून तांदूळ, तूरडाळ, साखर, खाद्यतेल, मीठ, अंगाचा व कपड्याचा साबण, हळद, मिरची पावडर, मसाला, जिरे, मोहरी आदी साहित्याची किट मोफत देण्यात येणार आहे. तसेच कोणत्याही गावामध्ये किराणा किट वाटप करण्यावरून राजकारण होऊ नये किंवा अन्य अडचणी येऊ नयेत यासाठी दर ४ गावांमध्ये एक विस्तार अधिकारी दर्जाचा क्षेत्रीय अधिकारी नेमून त्यांच्या नियंत्रणाखाली हे वाटप घरपोच करावे अशा सूचना धनंजय मुंडेंनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व संबंधितांना दिल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीला CAPF च्या १० तुकड्या राज्यात दाखल

News Desk

भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलांकडून कार्यकर्त्याला बेदम मारहाण

News Desk

आता संपूर्ण महाराष्ट्र तिसऱ्या टप्प्यात, कोरोनासह डेल्टा प्लसच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे घेतला निर्णय

News Desk