HW News Marathi
Covid-19

लिलावती रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग यशस्वी

नाशिक | “प्लाझ्मा थेरपीचा पहिला प्रयोग लिलावती रुग्णालयातील रुग्णावर आला असून तो यशस्वी आहे,” अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. “नायर रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा आज (२९ एप्रिल) दुसरा प्रयोग केला जाणार आहे. आणि हा दुसरा प्रयोग देखील यशस्वी होईल,” असा विश्वास डॉक्टरांनी राजेश टोपेंना दिला आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आणि नाशिकमधील जिल्हाधिकारांची मालेगावमधील कोरोनाचा वाढत्या आकड्यासंर्भात बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर आरोग्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलताना राज्यातील प्लाझ्मा थेरपीचा यशस्वी प्रयोगाची माहिती दिली आहे.

यावेळी राजेश टोपे म्हणाले, “गाईडलाईचे तंतोतंत पालन केल्याने प्लाझ्मा थेरपी यशस्वी होती, असे त्यांनी सांगितले. मुंबईत प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाल्याची माहिती मुंबई महानगर पालिकेच आयुक्त प्रविण परदेसी यांनी आरोग्य मंत्र्यांना फोनवरू दिली, ही माहिती त्यांनी आजच्या नाशिक बैठकीनंतर माध्यमांशी बोलतांना सांगितले. राजेश टोपेंनी सांगितले, नायर रुग्णालयात प्लाझ्मा थेरपीचा आज दुसरा प्रयोग केला जाणार आहे. आणि हा दुसरा प्रयोग देखील यशस्वी होईल,” असा विश्वास डॉक्टरांनी त्यांना दिला आहे

मुंबईमधील ८३ पॉझिटिव्ह रुग्णांना होम क्वारंटाईन करणार

आयसीएमआरच्या नवी गाईडलाईननुसार मुंबईमध्ये ८३ टक्के कोरोना पॉझिटिव्ह लोकामध्येय गंभीर स्वरुपाची क्षणे नाहीत. या पॉझिटिव्ह रुग्णांना ‘होम क्वारंटाईन’ करता येऊ शकते असे म्हटले आहे. मात्र, या लोकांना शिस्तबद्ध पद्धतीने होम क्वारंटाईन केले जाईल, अशी माहिती मुंबईचे आयुक्तांनी आरोग्यमंत्र्यांना दिली आहे. यामुळे मुंबईत ८३ टक्के लोकांनाचे बेड रिक्त झाल्यानंतर नव्या रुग्णांसाठी हे बेड उपलब्ध होईल असे त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगतिले. तसेच राज्यातील पूर्वीचा मृत्यू दर पाच वर होता. तो आता ४.२ वर आणि साडेतीनवर आल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

 

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दारूचे कारखाने लाॅकडाऊन काळातही सुरू होते का?, विश्वंभर चौधरींचा सरकारला सवाल

News Desk

 मुंबईतील झोपडपट्ट्यांना आर्किटेक्ट आणि विकासक जबादार, रतन टाटांची टीका

News Desk

शरद पवारांकडून पुण्यासाठी ८ सुसज्ज कार्डिओ ॲम्ब्युलन्सची घोषणा

News Desk