HW News Marathi
देश / विदेश

२० एप्रिलपासून राज्यातील ठराविक भागांत एसटी-बेस्ट वाहतूक सुरु होणार

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. देशातील पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन संपल्यानंतर आता १५ एप्रिल ते ३ मे असा दुसरा लॉकडाऊन पंतप्रधान मोदींकडून जारी करण्यात आला आहे. अर्थातच लॉकडाऊनच्या या काळात देशांतर्गत सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद आहे. मात्र, या लॉकडाऊनमध्ये २० एप्रिलनंतर ठराविक क्षेत्रांवरचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात येणार आहे. २० एप्रिलपासून राज्यातील काही उद्योग-व्यवसाय काही प्रमाणात सुरु होणार असल्याने आता वाहतूकही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यात एसटी आणि बेस्ट वाहतूक सुरू करण्यात येणार आहे.

येत्या २० एप्रिलपासून राज्य शासकीय कार्यालयांमध्ये १०% अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी आता त्यांना मंत्रालयात येण्या-जाण्यासाठी एस.टी. आणि बेस्टच्या विशेष बस सुविधा देण्याचा निर्णय या अधिसूचनेद्वारे घेण्यात आला आहे. राज्य सरकारने आज लॉकडाऊनसंदर्भात नवी सर्वसमावेशक अधिसूचना जारी केली असून त्यात नव्याने काही क्षेत्रांचा समावेश केला आहे. मुंबईत मंत्रालयासोबतच शहरातील आणखी काही भागांमध्ये एसटी बसेसची सेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे, सुमारे २२ बसेसच्या सुमारे १०० फेऱ्या वाढवण्यात येणार आहे.

जाणून घ्या, मंत्रालयातून प्रवाशांची ने-आण करण्यासाठी वेळापत्रक

मुंबई विभाग

पनवेल – मंत्रालय – 6

मंत्रालय – पनवेल – 6

ठाणे विभागासाठी यादी

आसनगाव -मंत्रालय – 2

मंत्रालय – आसनगांव – 2

बदलापूर – मंत्रालय – 5

मंत्रालय – बदलापूर – 5

डोंबिवली – मंत्रालय – 5

मंत्रालय – डोंबिवली – 5

कल्याण – मंत्रालय – 5

मंत्रालय – कल्याण – 5

शहापूर – मंत्रालय – 3

मंत्रालय – शहापूर – 3

मिरारोड – मंत्रालय – 3

मंत्रालय – मिरारोड – 3

पालघर विभागातून सुटणाऱ्या गाड्या

विरार – मंत्रालय – 5

मंत्रालय- विरार – 5

पालघर – मंत्रालय – 5

मंत्रालय – पालघर – 5

वसई – मंत्रालय – 5

मंत्रालय – वसई – 5

नालासोपारा – मंत्रालय – 5

मंत्रालय – नालासोपारा – 5

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, राजदूतांनी मागितली माफी

News Desk

रेल्वेगाडी 20 सेकंद लवकर सोडल्यामुळे प्रवाशांची माफी, जपानच्या खाजगी रेल्वेकंपनीने मागितली माफी

News Desk

भास्कर जाधवांची नार्को टेस्ट करा ! अतुल भातखळकरांची माहिती

News Desk