HW News Marathi
Covid-19

२३ जुलैपासून पुणेकरांना मिळणार लॉकडाऊनमधून दिलासा !

पुणे | राज्यांत सर्वच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामूळे काही जिल्ह्यांत लॉकडाऊन सुरु आहे. पुण्यात देखील बाधितांचे आकडा सध्या मुंबईपेक्षा अधिक होत असल्याने पुण्यात, पिंपरी- चिंचवड येथे लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, २३ जुलैपासून पुण्यात लॉकडाऊन नसेल, अशी महत्त्वाचे बातमी पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना २३ जुलैनंतर सुखाचा श्वास घेता येणार आहे.

आज (२० जुलै) माध्यमांशी बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता १० दिवसांचा लॉकडाउन जाहीर करण्यात आला. या काळात नागरिकांनी प्रशासनाला चांगले सहकार्य केले. त्यामुळे या लॉकडाउननंतर पुन्हा लॉकडाउन असणार नाही. मात्र, या पुढील काळात देखील आजपर्यंत शासनाने दिलेल्या आदेशाचे पालन नागरिकांना करावे लागणार आहे.

लॉकडाऊन केल्याने आमचे काम होणारं असे नाही आहे. जुलैमध्ये पुण्यात जास्त केलेस वाढल्या त्यामुळे हे पाऊल उचलावे लागले. सगळीकडे काय परिस्थिती आहे याचा आढाव्यात घेतला. लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही कामगाराने किंवा कंपनीने आमच्याकडे तक्रार केली नाही असेही त्यांनी सांगितले.

या नंतर लॉकडाऊन केला जाणार नाही. मात्र, ७ दिवसांमध्ये एखाद्या दिवशी गर्दी कशी कमी होईल यासाठी प्रयत्न केले जातील. गर्दी टाळण्यासाठी काही उपाययोजना केल्या जातील. जसं की, रविवारी मार्केटमध्ये जास्त गर्दी असते, अशावेळी काही निर्बंध लावण्याची विचार सुरु आहे, अशी माहिती देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र, तुर्तास तरी पुणेकरांना लॉकडाऊनमधून दिलास मिळाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

HW Exclusive : अबब…एका महिन्यात कमावले साडे चार लाख रुपये !

News Desk

आज एका दिवसात ९७ रुग्णांचा बळी, राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ५४ हजार ७५८ वर

News Desk

राज्यात आज ४,८७८ कोरोना रुग्णांची नोंद, तर २४५ जणांचा मृत्यू

News Desk