HW News Marathi
Covid-19

व्हायरल व्हिडिओवरून किरीट सोमय्या यांचे ‘वरळी पॅटर्न’ ?, तर पालिका व आरोग्यमंत्र्यांना लिहिले पत्र

मुंबई | वरळी कोळीवाड्यातील बहुतांश भागात मागील १५ दिवसांपासून एकही नवीन करोना रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे कोळीवाड्याच्या काही भागांतील सील बंद करण्याचा विचार मुंबई महापालिका करत आहे. यासंदर्भात पालिका लवकरच निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, दुसऱ्या बाजुला वरळीतील एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्हआला असूनही त्यांना एनएससीआय येथील क्वारंटाईनमधून घरी सोडण्यात येत आहे. या व्हिडिओची दखल भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकार आणि पालिकेवर टीका केली आहे. तर सोमय्या यांनी आरोग्यमंत्री व पालिकेला पत्रही लिहिले आहे.

वरळीतील एनएससीआयमध्ये उपचार घेणाऱ्या धनलक्षमी गणेश मयेकर यांनी एक व्हिडिओ बनवला आहे. यात धनलक्ष्मी यांचा २५ एप्रिला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. यानंतर उपचारासाठी एनएससीआय कॅम्पमध्ये आले. यानंतर १ मे रोजी कोरोनाची चाचणी केले तेव्हा रिपोर्ट निगेटिव्ह आली. पुन्हा एकदा डॉक्टरांनी चाचणी केल्यानंतर माझे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असूनही मला एनएससीआयमधून मला घरी सोडण्यात येत आहे. माला ४ वर्षाची मुलगी आणि माझ्या सासुला मधूमेह आणि उच्चरक्त दाब आहे, असे धनलक्ष्मी यांनी व्हिडिओमधून सांगितले आहे. सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे.

या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या यांनी ट्वीट सरकारवर टीका केली आहे. सोमय्या ट्वीटमध्ये म्हणाले, “वरळी पॅटर्न” !? बी डी डी चाळ च्या श्रीमती मयेकर आणि तिचा सासू , दोघांचा व्हिडिओ सोबत आहे. कॉरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट असूनही ठाकरे सरकार, त्यांना एन एस सी आय केंप मधुन घरी जाण्यास भाग पाडत आहे. अशी अमानवीय वागणूक थांबविण्यासाठी मी महापालिका आणि आरोग्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे”

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मनुष्यबळ विकास मंत्रालयाचे नाव बदलून ‘शिक्षण मंत्रालय’ असे नवे नामकरण

News Desk

कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किंमतींचा फायदा नागरिकांना मिळवा, सोनिया गांधीपाठोपाठ थोरातांनी केली मागणी

News Desk

मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनची भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्क सारखी अवस्था झाली असती

News Desk