HW News Marathi
महाराष्ट्र

नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान शहीद

गडचिरोली | एकीकडे पोलीस बांधव कोरोना संकटाविरोधात लढत असताना दुसरीकडे नक्षली कारवायांना उत आला आहे. आज (17 मे 2020) सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भामरागड तालुक्यातील पोरयकोटी-कोरपर्शी जगंलात नक्षलवाद्यांसोबत चकमक झाली. यात क्युआरटी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाने आणि एक सी-60 पथकाचा जवान शहीद झाला आहे.

आज (१७ मे) पहाटे ५ वाजताच्या सुमारास शीघ्र कृती दल आणि सी-60 पथकाचे जवान आलदंडी-गुंडुरवाही जंगलात नक्षलविरोधी अभियान राबवत असताना नक्षल्यांनी प्रथम भूसुरुंगस्फोट घडवून गोळीबार केला. पोलिसांनीही गोळीबाराला प्रत्युत्तर देत गोळाबार केला. मात्र, यात पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमने आणि शिपाई किशोर आत्राम हे शहीद झाले. तर गोंगलू ओक्सा, राजू पुसली आणि दसरु कुरचामी हे जवान जखमी झाले. दसरु कुरचामी या जवानाची प्रकृती गंभीर आहे.

दबा धरून बसलेल्या नक्षल्यांचा गोळीबार

आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नक्षल्यांविरूध्द शोधमोहिम राबविताना जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षल्यांनी गोळीबार केला. यामध्ये प्रत्युत्तर देत असताना पोलीस उपनिरीक्षक धनाजी होममाने व पोलीस जवान किशोर आत्राम शहीद झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक होममाने हे सोलापूर जिल्हा, पंढरपूर तालुक्यातील पुळूज येथील आहे. विशेष म्हणजे या चकमकीत एकही नक्षल ठार झाला नाही. जखमी जवानांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सहकारी बॅंक घोटाळ्यामध्ये अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या अडचणीत वाढ होणार का?

News Desk

मेळघाट हाटच्या माध्यमातून आदिवासी महिलांचे सक्षमीकरण!- यशोमती ठाकूर

Aprna

पाणी हक्कासाठी लढा देणार्‍या वयोवृद्ध आनंदराव पाटील यांना जयंत पाटलांनी दिले आश्वासन 

News Desk