मुंबई | गँगस्टर एजाज लकडावाला याला बिहारच्या पाटणा येथून मुंबई पोलिसांनी अटक केले आहे. मुंबई पोलिसाच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली आहे. लकडावाला या गँगस्टरविरोधात मुंबईत तब्बल २५ गुन्ह्यांची नोंद आहे, तर राज्यभरातही अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून मुंबई क्राईम ब्रांच लकडावला यांची पाठलाग करत होती. लकडावाला मुंबई पोलिसांनी पाटणामधून अटक केले आहे. लकडावालाला न्यायालयाने २१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
Gangster Ejaz Lakdawala who was arrested from Patna by Mumbai Police's anti extortion cell, and has been remanded to police custody till January 21 by Court pic.twitter.com/Ksku3wOHda
— ANI (@ANI) January 9, 2020
लकडावालाने छोटा राजनसोबत हातमिळवणी केल्याने दाऊद इब्राहिम नाराज होता. त्यामुळेच दाऊद इब्राहिमने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली. जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर लकडावाला बँकॉकहून कॅनडाला पळून गेला होता. यानंतर अनेक वर्ष लकडावाला येथेच राहिला. लकडावालाविरोधात मुंबई, दिल्लीसह विविध ठिकाणी दोन डझनहून अधिक केसेस नोंद आहे. ज्यामध्ये हत्या, खंडणी, धमकावणे, अपहरण अशा गुन्ह्यांचा समावेश आहे.
मुंबई पोलिसांची कामगिरी अभिनंदास्पद !
कुख्यात गॅंगस्टर एजाज युसुफ लकडावालाला पाटणामधून काल (८ जानेवारी) मुंबई पोलीसांनी अटक केली आहे. एजाज दाऊद, छोटा शकील, राजन सोबतही काम करत होते. लकडावालावर ८० गुन्हे दाखल आहेत. मुंबई पोलिसांची कामगिरी अभिनंदास्पद, असल्याचे गृहमंत्री अमित देशमुख यांनी आज (९ जानेवारी) पत्रकार परिषदेत म्हणाले.
ज्या पोलीस अधिकाऱ्यानी ही महत्त्वाची कामगिरी केली. यापूर्वी लकडावालाची मुलगी शिफा शेख हिने मनीष अडवाणी या फेक नावाने पासपोर्ट तयार केला होता. शिफा हिला पोलिसांनी मुंबई विमानतळावर अंतर्गत ताब्यात घेतला आहे. मुंबई पोलिसांनी याचा आधार घेत लकडावालाचा पाठलाग करत पाटणातून अटक केली.
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.