मुंबई | राज्यासह सर्वत्र आज(१० सप्टेंबर) गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मोठ्या जल्लोषात आणि थाटामाटात हा सण साजरा केला जात आहे. राज्यसरकारने गणेशोत्सवावर बरेच नियम लागू केले आहेत. गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना केल्यानंतर राजकारण्यांनी बाप्पाकडे साकडंही घातलं आहे. कुणी राज्यावरील कोरोनाच संकट दूर करण्याची याचना केली. तर कुणी बळीराजावरील संकट दूर करण्याची प्रार्थना केली. काहींनी तर स्वत:वरील विघ्नं दूर करण्याचं साकडं बाप्पाला घातलं आहे. तर काही राजकारण्यांनी सरकारला सुबुद्धी देण्याची प्रार्थनाही भाकली आहे.
नारायण राणे यांच्या घरात बाप्पाचं आगमन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. नारायण राणे यांनी सहकुटुंब बाप्पाचं स्वागत केलं आहे. “दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे मुंबई येथील अधिश या निवासस्थानी श्री गणरायाच्या मूर्तीची सहकुटुंब प्राणप्रतिष्ठापना केली. गणपती बाप्पा मोरया !,” असं ट्विट त्यांनी केलं आहे.
दरवर्षीच्या परंपरेप्रमाणे मुंबई येथील अधिश या निवासस्थानी श्री गणरायाच्या मूर्तीची सहकुटुंब प्राणप्रतिष्ठापना केली.
गणपती बाप्पा मोरया !with @meNeeleshNRane @NiteshNRane #गणेश_चतुर्थी #GaneshChaturthi pic.twitter.com/zg0eoAvMH0
— Narayan Rane (@MeNarayanRane) September 10, 2021
मुख्यमंत्र्यांच्या घरी गणरायाचं स्वागत
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वर्ष बंगल्यावर गणरायाचं आगमन झालं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे यावेळी उपस्थित होते. त्यांच्या पूजेचा फोटो ट्विटर शेअर केला आहे. “गणपती बाप्पा मोरया” म्हणत त्यांनी लाडक्या बाप्पाचं स्वागत केलं आहे.
गणपती बाप्पा मोरया!! pic.twitter.com/MNfUnCdnuw
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) September 10, 2021
देवेंद्र फडणवीसांच्या घरी बाप्पाचं आगमन
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याही घरी लाडक्या बाप्पाचं आगमन झालं आहे. गणपती कडे त्यांनी देशावर आलेल्या कोरोना संकट दूर व्हावं या साठी साकडं घातलं आहे आणि आपलं जीवन पुन्हा सुरळीत पाने सुरु झालं पाहिजे. शेतकऱ्याला बळ मिळावं व गणरायाचा त्यांच्यावर आशीर्वाद राहू देत हे सुद्धा त्यांनी सांगितलं आहे. यावेळी त्यांनी मंदिरं सुरु करण्यावरही भाष्य केलं आहे.
Sukhkarta, Dukhharta..!#GanpatiBappa arrives at our residence in Mumbai, like every year.
Celebrated #GaneshChathurthi with family..#GanpatiBappaMorya #Ganeshotsav #गणेश_चतुर्थी #गणपतीबाप्पामोरया #Mumbai #Maharashtra pic.twitter.com/n8cJnD1rkl— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 10, 2021
सर्व संकटे दूर होवोत
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याही घरी गणपतीचं आगमन झालं आहे. त्यांनी ही बाप्पाकडे साकडं घातलं आहे. “गणराया हा सर्व दुःखांचा हर्ता आहे. कोरोनामुळे, महापूरामुळे अनेकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे, अनेकांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. आता बाप्पाचे आगमन झाले आहे. ही सर्व संकटे दूर होवोत असं साकडं गणपती बाप्पाला घातले”, असं ट्विट करत त्यांनी केलं आहे. जयंत पाटलांनी सहपरिवार बाप्पाचं स्वागत केलं आहे.
आज सेवासदन या आमच्या शासकीय निवासस्थानी गणरायाचे आगमन झाले. सहकुटुंब बाप्पाची स्थापन करून पूजाअर्चा केली. मागचा कालखंड आपल्या सर्वांसाठीच मोठा अडचणीचा होता. जगभरात कोरोनाने थैमान घातले होते. तर महाराष्ट्रातही अतिवृष्टीमुळे पूराच्या संकटाचा सामना करावा लागला. #गणेशोत्सव #ganpati pic.twitter.com/LufT2exJqz
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 10, 2021
प्रवीण दरेकर यांच्याही घरी बाप्पाचं आगमन
भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या घरी गपतीची आरास झाली आहे. “कोरोनामुळे सर्वांमध्ये एक प्रकारची चिंता आणि नैराश्याचे वातावरण झालेले आहे परंतु गणपती बाप्पा चे आज आगमन झाले आहे आणि बाप्पाच्या आगमनामुळे या सर्व संकटांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढणार आहे!”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
गणपती तुझे नांव चांगले |
आवडे बहु चित्त रंगले ||
प्रार्थना तुझी गौरी नंदना |
हे दयानिधे! श्रीगजानना ||
आमच्या घरी आज श्री गणरायाचे आगमन झाले आहे. गणपती बाप्पा सर्वांच्या मनोकामना पूर्ण करो! pic.twitter.com/xeJjGkKTuT— Pravin Darekar – प्रविण दरेकर (@mipravindarekar) September 10, 2021
गणराया सर्वांना यश दे
भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांच्याही घरी गणरायाचं स्वागत करण्यात आलं आहे. “गणराया सर्वांना यश दे, आनंद दे, मनोकामना पूर्ण कर,” असं ट्विट त्यांनी केलं आहे. सरावांना सुखी आणि यश मिळूदेत अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
#GaneshChaturthi #GanpatiBappaMorya #गणेशोत्सव२०२१ #गणपति_बप्पा_मोरया गणराया सर्वांना यश दे, आनंद दे, मनोकामना पूर्ण कर. pic.twitter.com/Y4kH07GoPF
— Keshav Upadhye (@keshavupadhye) September 10, 2021
26 वर्षांची उत्सवाची परंपरा कायम
भाजप आमदार आशिष शेलार यांनी त्यांची 26 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे. वांद्रे पश्चिम इथल्या भागात ते दार वर्षी सार्वजनिक गणपतीची स्थापना करतात, याचीही वर्षी त्यांनी मोठ्या उत्साहात ही परंपरा चालू ठेवली आहे. गेली 26 वर्ष आशिष शेलार ही परंपरा सांभाळून आहेत.
#GanpatiBappaMorya 26 वर्षांची उत्सवाची परंपरा कायम ठेवत आज आमच्या वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे बाप्पा विराजमान झाले! #GaneshChaturthi2021 pic.twitter.com/ajxFTTnZrv
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) September 10, 2021
शिवसेना खासदाराकडून शुभेच्छा
शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याही घरी गणपतीचं आगमन झालं आहे. ट्विट करत त्यांनी त्यांच्या घरच्या गणपतीचं दर्शन दिलं आहे, सोबत सर्वांना शुभेच्छाही दिल्या आहेत. “गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा!”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
गणेश चतुर्थीच्या सर्वांना मनःपुर्वक हार्दिक शुभेच्छा! pic.twitter.com/sejX5qIvRy
— VinayakRaut_Official (@Vinayakrauts) September 10, 2021
कोरोनाचे संकट संबंध महाराष्ट्र आणि देशावर
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “दरवर्षीप्रमाणे आमच्या घरी श्रीगणेशाची अतिशय श्रद्धापूर्वक आणि भक्तीपूर्वक प्रतिष्ठापना झाली. यंदाचा गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करावा लागत आहे, त्याचे कारण म्हणजे कोरोनाचे संकट संबंध महाराष्ट्र आणि देशावर आहे”, असं ट्विट करत त्यांनी माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातील सर्व जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा! #गणेश_चतुर्थी #श्रीगणेश pic.twitter.com/bg2NIiRDM1
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) September 10, 2021
विजय वडेट्टीवारांनी वेगळ्या पद्धतीने केला सण साजरा
विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या पद्धतीने गणपती सण साजरा केला आहे. भारतातील एकमेव मनोरुग्णालयात जाऊन त्यांनी गणरायाची आरती केली आहे. याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली आहे. “तुमच्या आमच्या सारख्या सामान्यांना गणेशोत्सवाचा जो उत्साह असतो,तोच उत्साह बाप्पांसाठी मनोरुग्णांचा असतो हे आज मला जाणवले.
मध्य भारतातील एकमेव मनोरुग्णालय असलेल्या नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयात मनोरुग्णांच्या उत्साहात सहभागी होत गणरायांच्या मूर्तीची स्थापना करून पूजा केली”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
सदैव स्मरणात राहील असे गणेशपूजन करण्याची संधी आज मला मिळाली.
गणेशोत्सव म्हटलं की चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व उत्साहाने आपल्या लाडक्या बाप्पांच्या स्वागतासाठी सज्ज असतात.(1/3) pic.twitter.com/NgJAY7cqGe— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) September 10, 2021
आला आला माझा गणराज आला…
भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या घरीही बाप्पाचं आगमन झालं आहे. चित्रा वाघ आणि सहकुटुंब त्यांनी गणरायाचं स्वागत केलं आहे. “ॐ केशवाय नमः ।ॐ नारायणाय नमः ।ॐ माधवाय नमः ।बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना…..आला आला माझा गणराज आला…गणपती बाप्पा मोरयाऽऽऽऽऽऽऽऽ”, असं ट्विट करत त्यांनी बापाचं स्वागत केलं आहे.
ॐ केशवाय नमः ।ॐ नारायणाय नमः ।
ॐ माधवाय नमः ।
बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना…..
आला आला माझा गणराज आला…
गणपती बाप्पा मोरयाऽऽऽऽऽऽऽऽ pic.twitter.com/cOxM5d5V9e— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) September 10, 2021
करोनाचं जागतिक संकट दूर कर
भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनीही सहकुटुंब गणपती सण साजरा केला आहे. प्रीतम मुंडे यांनी ट्विट करत गणरायाचे दर्शन चाहत्यांना दिले आहेत. “दरवर्षीप्रमाणे यंदाही आईबाबांच्या घरच्या गणपती पूजनात सहभागी होऊन बाप्पाचे आशिर्वाद घेतले. करोनाच जागतिक संकट आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीच सावट दूर करण्याची विघ्नहर्त्याला प्रार्थना केली”, असं ट्विट त्यांनी केलं आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आईबाबांच्या घरच्या गणपती पूजनात सहभागी होऊन बाप्पाचे आशिर्वाद घेतले.करोनाच जागतिक संकट आणि महाराष्ट्रातील अतिवृष्टीच सावट दूर करण्याची विघ्नहर्त्याला प्रार्थना केली. pic.twitter.com/RP6J2bEVdC
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) September 10, 2021
पुराचे विघ्न हरण्याचे विघ्नहर्ता गणरायाला साकडे
महाराष्ट्राचे सामाजिक व न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचीही गणपतीची आरास केली आहे. गणेश चतुर्थीनिमित्त आज परळीतील निवासस्थानी श्री गणेशाचे विधिवत पूजन करून श्रींची प्रतिष्ठापणा केली. राज्यावरील कोविड संसर्गाचे तसेच अतिवृष्टी व पुराचे विघ्न हरण्याचे विघ्नहर्ता गणरायाला साकडे घातले. पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!”, असं ट्विट करत त्यांनी चाहत्यानं दर्शन दिलं आहे.
गणेश चतुर्थीनिमित्त आज परळीतील निवासस्थानी श्री गणेशाचे विधिवत पूजन करून श्रींची प्रतिष्ठापणा केली. राज्यावरील कोविड संसर्गाचे तसेच अतिवृष्टी व पुराचे विघ्न हरण्याचे विघ्नहर्ता गणरायाला साकडे घातले.
पुन्हा एकदा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!#गणपती_बाप्पा_मोरया pic.twitter.com/lW7ECuR3b0— Dhananjay Munde (@dhananjay_munde) September 10, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.