HW News Marathi
महाराष्ट्र

जळगावात पोस्टरचा धुमाकूळ, भाजप नेत्याच्या पोस्टरवर खडसेंचा फोटो

जळगाव | ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम करत राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश केला. त्यानंतर आता उत्तर महाराष्ट्रात आणखी धक्के देण्याचा इशारा खडसेंसह राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी भाजपला दिला आहे. आता भाजपचे भुसावळचे आमदारही खडसेंच्या पावलावर पाऊल टाकण्याची चिन्हं वर्तवली जात आहेत. आमदार संजय सावकारे यांच्या पोस्टरवर झळकलेला खडसेंचा फोटो लावला आहे.

भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे हे एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सावकारेही हातात घड्याळ बांधणार का, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच सावकारेंच्या वाढदिवसानिरिमत्त झळकलेलं पोस्टर राजकीय वर्तुळात चर्चेचा नवा विषय ठरला आहे. सावकारेंच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या कुठल्याही नेत्याचा फोटो न लावता फक्त एकनाथ खडसे यांचा फोटो लावला आहे. या पोस्टरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खडसेंचे खानदेश समर्थक म्हणून ओळख असलेले भुसावळचे आमदार संजय सावकारे आणि त्यांच्या समर्थकांनी वाढदिवशीच धक्का दिला आहे. एकनाथ खडसे यांच्यासोबत असल्याचा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी सोशल मीडिया आणि जाहिरातीच्या माध्यमातून दिला आहे. या पोस्टर किंवा वृत्तपत्रातील जाहिरातींमध्ये भाजपचे उत्तर महाराष्ट्रातील बडे नेते आणि संकटमोचक अशी ख्याती असलेल्या गिरीश महाजन यांचा फोटो नाही. भाजपच्या कुठल्याही मोठ्या नेत्यांचे छायाचित्र नाही. त्यामुळे संजय सावकारे यांचं पुढचं पाऊल कुठल्या दिशेने पडणार, याची उत्सुकता लागली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

महाराष्ट्र राज्याचे चौथे महिला धोरण अंतिम टप्प्यात! – यशोमती ठाकूर

Aprna

कोरेगाव-भीमा प्रकरणात पोलिसांनी पुरावे तोडून-मोडून सादर केले…

swarit

भाजपच्या  घोटाळेबाज मंत्र्यांना शिवसेनेने केले लक्ष 

News Desk