HW News Marathi
Covid-19

गणेशमूर्तींची उंची ४ फुटापर्यंतचं ! मुर्तीची उंची नव्हे भक्ती महत्वाची …

मुंबई | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आपण सारे येणारा गणेशोत्सव नियम पाळून, साधेपणाने साजरा करूयात. श्रीगणेशाच्या मूर्तीची उंची महत्त्वाची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. मूर्ती 4 फुटापर्यंत असावी गणेशोत्सव काळात कुणीही कुठेही गर्दीकरू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

मुख्यमंत्री आपल्या आवाहनात म्हणतात की, ‘कोरोनामुळे प्रत्येक क्षेत्रात संकट आले आहे. त्या संकटापासून धर्म, परंपरा, संस्कृतीहीसुटलेली नाही. गर्दी टाळण्यासाठी देशभरातील सर्वच प्रार्थनास्थळे बंद ठेवली आहेत, हे क्लेशदायक असले तरी मनुष्यहानीटाळण्यासाठी याशिवाय दुसरा उपाय आज नाही.

आता आपला सणांचा राजा गणेशोत्सव येत आहे. गणेशोत्सवाची एक उज्ज्वल परंपरा महाराष्ट्राने जपली आहे. श्री गजाजन घरोघरयेतात. पण लोकमान्य टिळकांनी त्यास सार्वजनिक उत्सवाचे स्वरूप देऊन सामाजिक, राजकीय चळवळ निर्माण केली. मोठी जनजागृतीत्यातून आजही होत असते.

मुंबईपुण्यातील भव्य गणेशमूर्ती, देखावे जगाचे आकर्षण ठरते. ते पाहण्यासाठी ११ दिवस प्रचंड गर्दी होत असते. निदान या वर्षी तरीआपल्याला हे सर्व टाळावे लागेल. मुंबईसह महाराष्ट्रातील सार्वजनिक गणेश मंडळांशी माझी चर्चा झाली. शिस्तीचे सामाजिक भानठेवून उत्सव करावा यावर एकमत झाले.

गणरायांचे आगमन घरी होईल तसे सार्वजनिक उत्सवी मंडपांतही होईल. गणराय येताना महाराष्ट्रासाठी आशीर्वाद, सुरक्षा कवचघेऊनच येतील. पण भव्य मूर्तीऐवजी फुटांपर्यंतच्या मूर्तीचीच मंडपात प्रतिष्ठापना व्हावी, यावर एकमत झाले आहे. मोठ्या मूर्तीमुळेत्यांचे आगमन विसर्जनप्रसंगी जास्त कार्यकर्ते लागतात. ते टाळावे लागेल. शेवटी मूर्तीची उंची नाही तर भक्ती महत्त्वाची आहे. माझेआपणास आवाहन आहे की, मंडपात नेहमीची गर्दी नको. गणरायांचे विसर्जन कमीत कमी गर्दी, नियमांचे पालन करत होईल. मंडपदेखील लहान आणि साधेच पण सुंदर असतील असे पाहा. उत्सवास भीतीचे गालबोट लागू नये यासाठीच सार्वजनिक मंडळांशीचर्चा करून हे सर्व ठरले आहे.

श्री गणरायांचे आगमन नेहमीच्या परंपरेनेच होईल गणरायांचे आगमन महाराष्ट्राचे मांगल्य संस्कारास बळ देईल. कोरोनाचे संकटतात्पुरते आहे. गणरायाच्या कृपेने या विघ्नाचेही विसर्जन होईल.

कोरोनामुळे आषाढीचा भव्य पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांची पंढरी वारीही रद्द केली आहे. पण पालखीची परंपरा मोडता हे केले. मुंबईतीलगोविंदा उत्सवम्हणजे दहीहंड्या रद्द केल्या. प्रताप सरनाईक यांच्यासारख्या आमदारांनी दहीहंडी उत्सवाचे कोटी रुपयेकोरोना लढाईसाठी खर्च केले. महाराष्ट्राच्या सामाजिक कार्याचा हा आदर्श परंपरा सार्वजनिक गणेशोत्सवातही दिसेल.

महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहेच! ती परिस्थिती समजून घेईल. विघ्नहर्ता गणराया पाठीशी आहेच!

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

२० लाख कोटी नव्हे हे तर प्रत्यक्षात फक्त १ लाख ८६ हजार ६५० कोटींचे पॅकेज !

News Desk

पुणे शहर कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती

News Desk

पुणे जिल्ह्यात १० दिवसांचा लाॅकडाऊन,काय चालु काय बंद जाणून घ्या

News Desk