HW News Marathi
Covid-19

पुण्यातील उद्याने बंद करा अशी महापौरांची आयुक्तांकडे पत्रातून मागणी

पुणे | कोरोनाच्या पार्श्वभूीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नागरिकांना काही सवलती दिल्या. या सवलती देताना पुण्यातील विविध भागातील ३१ उद्याने सुरु करण्यात आली. मात्र, कोरोनाचा वाढता संसर्ग आणि पुणेकरांचा बेशिस्तपणा यामुळे अखेर ही उद्याने बंद करण्याची मागणी होत आहे. स्वतः पुणे महानगरपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनीच आयुक्तांना पत्र लिहून शहरातील सर्व उद्याने पुन्हा बंद करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे पुण्यातील सुरु असलेले सर्व ३१ उद्याने पुन्हा बंद होण्याची शक्‍यता आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांचे मृत्यूही होत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत उद्याने उघडून काय साधायचे आहे? असा सवाल महापौर मोहोळ यांनी केला आहे. मोहोळ यांनी उद्याने बंद करण्याच्या मागणीवर महानगरपालिका प्रशासन आज (१६जून) अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.

अनलॉक १ नावाने लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात नागरिकांना काही बंधने घालून उद्याने आणि मैदाने खुली करण्यात आली. मात्र, नागरिकांकडून योग्य काळजी घेतली जात नसल्याचे दिसून आले. उद्यानात येणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचारी नेमावे लागले. आधीच अपुरे कर्मचारी असताना गरजेच्या नसलेल्या बाबींना प्राधान्य नको, अशी भूमिका घेत महापौर मुरलीधर मोहोळ यांनी उद्याने बंद करण्याचा आग्रह धरला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

१६ जानेवारीपासून देशात कोरोना लसीकरण सूरू होणार, केंद्राने जारी केले नियम

News Desk

आता महाराष्ट्राच्या बदनामीच्या षडयंत्राचा मास्टरमाईंड कोण ? याची CBIने चौकशी करावी !

News Desk

इंधन दरवाढ कायम, जाणून घ्या…आजचे पेट्रोल-डिझेलचे भाव

News Desk