HW News Marathi
महाराष्ट्र

धक्कादायक! पुण्याच्या कात्रजमध्ये गॅस सिलेंडरचे स्फोट

पुणे | पुण्यातील कात्रज भागातून धक्कादायक बातमी समोर येत आहे. कात्रजमधील गंधर्व लॉ़न्स जवळ जवळपास २० सिलेंडरचे स्फोट झाल्याची गंभीर घटना घडली आहे. एकाच वेळी इतक्या सिलेंडरचे स्फोट झाल्याने कात्रज परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी सुद्धा घटनास्थळी धाव घेतली आहे.

कात्रज भागातील गंधर्व लॉन परिसरात एका पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा साठा करून ठेवण्यात आला होता. अचानक सायंकाळी मोठा स्फोट झाल्याचा आवाज आला. एका पाठोपाठ एक असे सिलेंडरचे स्फोट झाले आणि परिसरात मोठी खळबळ उडाली. या सिलेंडरचे स्फोट होत असतानाचा एक व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये सिलेंडरच्या स्फोटांमुळे परिसरात आगीचे लोट पाहायला मिळत आहेत. दरम्यान, हा परिसर दाटीवाटीचा असून रस्ता सुद्धा अरुंद असल्यामुळे अग्निशमन दलाच्या गाड्या येण्यास काहीसा विलंब झाला. मात्र, उशीरा का होईना पण आग आटोक्यात आल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, यामुळे धक्कादायक बाब जी समोर आली आहे ती म्हणजे सदर पत्र्याच्या शेडमध्ये सिलेंडरचा बेकायदेशीर साठा कऱण्यात आला होता, अशी शक्यता अग्निशमन दलाकडून वर्तवण्यात  आली आहे. तसेच गॅस लिकेज होऊन स्फोट झाला असावा, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. मात्र, आगीचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान, या आगीचे लोट इतके प्रचंड होते की हे दृश्य पाहणारे व आजूबाजूचे नागरिक घाबरून गेले होते. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली होती. 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मी वापरलेल्या ‘त्या’ शब्दाचा अर्थ सर्व शब्दकोशात उपलब्ध!

News Desk

जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा मराठवाड्यासाठी आणखी एक दिलासादायक निर्णय !..

News Desk

दुष्काळग्रस्तांना दिलासा, योजनांची अंमलबजावणी करण्यास निवडणूक आयोगाची परवानगी

News Desk