HW News Marathi
महाराष्ट्र

CDR मिळवणे हा गुन्हा ! सचिन सावंत यांचा फडणवीसांवर निशाणा

मुंबई | प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीचे प्रकरण, या गाडीचे मूळ मालक मनसुख हिरेन यांचा धक्कादायक पद्धतीने झालेला मृत्यू आणि पोलीस अधिकारी सचिन वाझे या प्रकारणांमुळे राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. विधिमंडळ अधिवेशनातही त्याचे मोठे पडसाद उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे CDR रिपोर्ट्स असल्याचा दावा सभागृहात केला होता. याच पार्श्वभूमीवर, आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधत फडणवीस यांनी त्यांच्याजवळ असलेल्या CDRची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी, अशी मागणी देखील केली आहे. सचिन सावंत म्हणतात की, “CDR मिळवणे हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने CDR रॅकेट उघडकीस आणले होते. नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही.”

सचिन सावंत नेमके काय म्हणाले ?

“सन्माननीय विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी CDR ची माहिती तपास यंत्रणांकडे द्यावी व गुन्हेगारांना शासन करण्यास मदत करावी. नागरिक म्हणूनही तपास यंत्रणांना स्त्रोत सांगणे त्यांचे कर्तव्य आहे. CDR मिळवणे हा गुन्हा आहे. काही दिवसांपूर्वी क्राईम ब्रांचने CDR रॅकेट उघडकीस आणले होते. नेत्यांकडून जनतेने योग्य आदर्श घेतला पाहिजे. सर्वसामान्यांना एक न्याय व नेत्यांना दुसरा न्याय योग्य नाही. कायदा सर्वांसाठी समान आहे. विधिमंडळात मोठ्या आवाजात प्रश्न दबता कामा नये. स्वतः मुख्यमंत्री राहिलेले विरोधी पक्षनेते याचा निश्चित विचार करतील हा विश्वास आहे व विनंतीही आहे”, असे ट्विट सचिन सावंत यांनी केले आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर एसएफआय करणार राज्यव्यापी आंदोलन

News Desk

निलोफर मलिक यांची देवेंद्र फडणवीसांना अब्रू नुकसानीची नोटीस!

News Desk

पुरामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ तर भंडारा जिल्ह्यातील ७८ रस्ते वाहतुकीकरिता बंद

Aprna