HW News Marathi
महाराष्ट्र

घरकुल घोटाळा : गुलाबराव देवकर यांच्या जामीन अर्जावर २६ सप्टेंबरला सुनावणी

वाल्मिक जोशी | जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झाल्यानंतर राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि चोपड्याचे शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्यासह २८ जणांनी जामिन आणि शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका आज (१९ सप्टेंबर) न्यायालयात दाखल केली असून करून घेतले असून या याचिकेवर २६ सप्टेंबरला सुनावणी होणार आहे.

जळगाव येथे नऊ जागांवर बांधण्यात येणाऱ्या घरकुल योजनेत कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा गुन्हा धुळ्यातील विशेष न्यायालयात सिध्द झाला होता. यानंतर न्यायाधीश सृष्टी निळकंठ यांनी निकाल देताना सुरेश जैन, राजेंद्र मयुर, प्रदीप रायसोनी, जगन्नाथ वाणी यांच्यासह ४९ आरोपींना वेगवेगळया कलमांमध्ये सक्तमजुरीची शिक्षा आणि दंड ठोठवण्यात आला आहे. दंडाची एकूण रक्कम १८१ कोटी २४ लाख ५९ हजार एवढी आहे.

न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर आता उच्च न्यायालयात निकालास आव्हान देण्यासाठी धडपड सुरू झाली आहे. दरम्यान, आज औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज दाखल करून घेतले असून पुढील सुनावणी आता २६ सप्टेंबरला होणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने फडणवीसांचा खोटारडेपणा उघड! – नाना पटोले

Aprna

प्रत्येक निवडणुकीला चिन्ह बदलतच विजय मिळवत आलो आहे !

News Desk

सिडकोची ऑनलाईन प्रणाली सोपी करण्यासोबतच ‘ईज ऑफ डुईंग बिजनेस’ कक्षही स्थापन होणार

Aprna