HW News Marathi
Covid-19

महाराष्ट्रातील कोरोना स्थिती पाहून गिरीश बापट यांचे मोदींना पत्र

पुणे | देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. यामुळे केंद्रासह राज्याच्या अडचणी वाढल्या आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा कहर पाहायला मिळत आहे. राज्यातील कोरोना हॉट्स्पॉट ठरलेल्या पुण्यात कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे खासदार गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे. सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोना लसीचा पुरवठा वाढवा, अशी मागणी गिरीश बापट यांनी केली आहे.

महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसीचा पुरवठा वाढवावा, अशी मागणी गिरीश बापट यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे. त्याशिवाय ३० वर्षावरील व्यक्तींचे लसीकरण सुरु करावे, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे. यामुळे कोरोना संसर्गाचा प्रसार रोखण्यास मदत होईल.

 

पुण्यातील कोरोना स्थिती

पुण्यात गेल्या काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. काल दिवसभरात २३४२ जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर दिवसभरात १७८९ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. पुण्यात काल दिवसभरात १७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातील २ रुग्ण हे पुण्याबाहेरील असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. पुण्यात सध्या ५२४ गंभीर रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुण्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २३,०६५ आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

देशात गेल्या २४ तासात भारतात ४५ हजार ८९२ नवे रुग्ण तर ८१७ रुग्णांनाचा मृत्यू

Jui Jadhav

परिवहन मंत्री अनिल परब यांची हकालपट्टी करण्याची भाजपची मागणी

News Desk

इंदूरमध्ये डाॅक्टरांवर हल्ला ! नेमकं काय झालं ,जाणून घ्या ..

Arati More