HW News Marathi
महाराष्ट्र

ट्रोलिंग करत मनोरंजन झाले, तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे!

सांगली | जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले असतानाचा बोटीतून सेल्फी व्हिडिओ सध्या राज्यभरात चांगलाच व्हायरल होत आहे. राज्यातील पूर परिस्थितीची महाजनांना गांभीर्य नसल्याचे त्यांच्या कृत्यातून दिसून आले. यानंतर सर्व स्तरातून त्यांच्यावर टीका होऊ लागली. यानंतर महाजन यांनी सांगली येथील गेल्या चार दिवसांपासून कोणतीही न मिळालेल्या भाग पोहचल्याचा व्हिडिओ त्यांनी त्यांच्या ट्वीटर हँडलवर टाकून विरोधकांवर टीका केली.

महाजन यांनी त्यांच्या ट्वीटमध्ये म्हटले की, “गेल्या ४ दिवसांपासून मदत न मिळालेल्या गावांत आज पोहोचलो. मदतकार्याचे राजकारण करणाऱ्या विरोधी पक्षांतील नेत्यांना मी विनंती करतो की आपले घरात बसून टीका-ट्रोलिंग करत मनोरंजन झाले असेल तर येऊन प्रत्यक्ष मदतकार्यात सहभागी व्हावे!,” असा टोला विरोधकांना लगावला आहे.

महाजनांच्या सेल्फी व्हिडिओमध्ये ते पूर परिस्थितीचा आढवा घेण्यासाठी जात असताना बोटीत बसले असून मोबाईलमध्ये बघत असून हासत हात दाखवित आहेत. या व्हिडिओमध्ये जे दिसते ते पाहता, महाजन पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी गेले होते की पर्यटनासाठी ? असा प्रश्न पडतो.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पोटनिवडणूकीवरुन राजकारण तापलं, पोटनिवडणुकीविरोधात न्यायालयात जाण्याची पंकजा मुंडेंची भूमिका

News Desk

अलमट्टी धरणावर बंधारे बांधल्यास कोल्हापूर–सांगली जिल्ह्यात विपरीत परिणाम; कर्नाटक सरकारला तात्काळ वस्तुस्थिती कळविणार! – उपमुख्यमंत्री

Aprna

गोपीचंद पडळकर हे सडक्या मानसिकतेचा कीडा | महेश तपासे

News Desk