HW News Marathi
महाराष्ट्र

गिरीश महाजनांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवा! – एकनाथ खडसे

जळगाव | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकानाथ खडसे आणि भाजप नेते गिरीश महाजन यांचं राजकीय वैर अद्यापही कायम आहे. दोन्ही नेते नेहमीच एकमेकांच्या विरोधात टीका करताना पाहायला मिळतात. तर आता पुन्हा एकदा त्यांच्यातला वाद वाढण्याची शक्यता आहे. “गिरीश महाजन यांना पुण्याच्या बुधवार पेठेत पाठवलं पाहिजे”, असा खडसे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. खडसेंच्या या वक्तव्यानंतर राजकीय क्षेत्रात पुन्हा एका एकदा चर्चेला उधाण आले असून हा वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

गिरीश महाजनांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. तर दुसरीकडे मराठा विद्या प्रसारक संस्था वादाच्या प्रकरणावरुन पोलिसांकडून त्यांची चौकशी देखील सुरू आहे. यावरुन एकनाथ खडसे यांनी गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे. महाजनांवर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरु असल्याच्या भीतीमुळे त्यांना पुन्हा कोरोना झाला का? असा सवाल खडसेंनी केला होता. त्यानंतर महाजनांनी देखील यावर प्रत्युत्तर देत खडसे यांना ठाण्यातील वेड्याच्या रुग्णालयात दाखवलं पाहिजे, असा टोला लगावला होता. यावर पुन्हा एकदा खडसेंनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “मला ठाण्यात दाखविण्याची गरज नाही. पण, गिरीशभाऊंना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे”, अशा शब्दांत त्यांनी महाजनांवर टीका केली आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे ?

दरम्यान, एकनाथ खडसेंना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हा ईडीकडून अटक होणार असल्याच्या भीतीपोटी खडसेंना कोरोना झाला, असा आरोप त्यावेळी, महाजनांनी केला होता. तर आता गिरीश महाजन यांना परत कोरोनाचा संसर्ग झाला असल्याचं समजताच खडसे म्हणाले, “मला कोरोना झाला तेव्हा ईडीची चौकशी पाठी लागल्यामुळे कोरोना झाला, असं ते म्हणायचे. पण, मला तर खरंच कोरोना झाला होता. मात्र, आता महाजनांना दुसऱ्यांदा कोरोना झालाय, त्यामुळे मला वाटतं मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू असल्याच्या भीतीपोटी त्यांना कोरोना झाला आहे.”

पोलिसांकडून अटक होण्याच्या भीतीने महाजनांना कोरोनाची लागण झाली आहे, असा टोला खडसेंनी लगावल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना महाजनांनी खडसेंना ठाण्याच्या हॉस्पिटलमध्ये दाखवावे, अशी टीका केली होती. तर खडसेंनी “गिरीशभाऊ यांना पुण्याच्या बुधवार पेठेत दाखवावे. जळगावमध्ये मोक्का गुन्ह्यामध्ये जे आरोपी आहेत, त्यांच्या घरांवर पुण्यातील पोलिसांनी छापेमारी सुरू केली आहे. मोक्का गुन्ह्याच्या संदर्भात आज जी कारवाई सुरू आहे, त्यासंदर्भात आधिक माहिती घेण्यासाठी हे छापे असावेत, असे मला वाटते”, असे खडसे म्हणाले. तसेच आज जे छापे पडले त्याचा आणि मी जे मोक्कासंदर्भात काल म्हणालो त्याचा दुरान्वये देखील संबंध नाही. तो एक योगायोग समजावा, असंही यावेळी खडसेंनी सांगितलं.

गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर

खडसेंच्या या टीकेला आता पुन्हा महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय. ते म्हणाले, एकनाथ खडसेंचं डोकं फिरलंय, ते वाट्टेल तसं बरळतात. खोटेनाटे गुन्हे दाखल करून पोलिसांवर दबाव आणून मोक्काची भीती दाखवण्याचं काम ते करतात, असा आरोपही महजनांनी केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

३१ डिसेंबर निमित्त आयोजित कार्यक्रम व नववर्षाचे स्वागत कार्यक्रमांसंदर्भात गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना जारी

Aprna

राज्यभर ७०० ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही

Aprna

‘…आणि बाळासाहेब ठाकरेंनी विषारी नाग माझ्या हातावर ठेवला’, राज ठाकरेंना सांगितली ‘ती’ घटना 

News Desk