HW News Marathi
महाराष्ट्र

‘प्लॅस्टिक बॉटल द्या, चहा-वडापाव खा’; पिंपरी चिंचवड महापालिकेचा भन्नाट उपक्रम

पिंपरी-चिंचवड | आपल्या शहराला ‘प्लॅस्टिक मुक्त’ बनवण्यासाठी इतर पालिकांप्रमाणे पिंपरी चिंचवड महापालिकेचेही बरेच प्रयत्न सुरू आहेत. याच पार्श्वभूमीवर पालिकेने आता एक अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. ‘प्लॅस्टिक बॉटल द्या आणि चहा-वडापाव खा’ या उपक्रमाअंतर्गत काही ठरावीक ठिकाणच्या वडापाव विक्रेत्यांकडे प्लॅस्टिकच्या बॉटल दिल्यास त्या बदल्यात ग्राहकांना मोफत चहा आणि वडापाव खाण्यास मिळणार आहे. या उपक्रमामुळे परिसर स्वच्छ ठेवण्यास नागरिकांचाही हातभार लागेल, असा पालिकेचा हेतू आहे.

शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी परिसरात निर्माण होणारा प्लास्टिकचा कचरा रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड पालिका प्रयत्न करत आहे. त्यानुसार शहरातील प्लस्टिकचा कचरा कमी करण्यासाठी महापालिकने हा अनोखा उपक्रम राबवला आहे. या उपक्रमात शहरातील छोटे हॉटेल व्यावसायिक किंवा टपरी, हातगाडी विक्रेते सहभागी होणार आहेत. ग्राहकांनी रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या वडापाव विक्रेत्यांना दिल्यास त्या बदल्यात त्यांना चहा आणि वडापाव मिळणार आहे. तर संबंधित विक्रेत्यांनाही पालिकेकडून नुकसान भरपाई दिली जाणार आहे.

या उपक्रमाअंतर्गत ग्राहकांनी विक्रेत्यांकडे ५ प्लॅस्टिक बॉटल जमा केल्यानंतर एक कप चहा आणि १० प्लॅस्टिक बॉटल्स दिल्यावर एक वडापाव मिळणार आहे. तसेच विक्रेत्यांनीही या बॉटल महापालिकेला सुपूर्त करायच्या आहेत. त्या बदल्यात महापालिका विक्रेत्यांना एक कप चहासाठी १० रुपये, तर एका वडापावचे १५ रुपये अदा करणार आहे, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. के. अनिल रॉय यांनी दिली आहे.

प्लास्टिकचा कचरा इथे-तिथे न फेकता योग्य ठिकाणी जमा केल्यास त्याचा मोबदला मिळेल, या उद्देशाने शहरातील प्लास्टिकचा कचरा कमी होण्यास मदत होईल, अशी आशा महापालिका प्रशासनाने व्यक्त केली आहे. दरम्यान, विक्रेता किंवा व्यावसायिकांकडे अधिकृत अन्न परवाना असणे, तसेच त्यांच्या हॉटेल व व्यवसायाच्या ठिकाणी स्वच्छता असणे आवश्यक आहे. तरच त्यांना परवानगी दिली जाणार आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

साप अंगावरून गेला अन मी मुख्यमंत्री झालो: शरद पवार

News Desk

गोव्यात नौदलाचे लढाऊ विमान कोसळले, सुदैवाने पायलट बचावले

News Desk

मित्र पक्षाने रडीचा डाव खेळू नये – शरद पवार

swarit