HW News Marathi
महाराष्ट्र

साप अंगावरून गेला अन मी मुख्यमंत्री झालो: शरद पवार

मुंबई दिलीप वळसे-पाटील यांच्या एकसष्टीच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक दिलखुलास आठवण सांगितली. शरद पवार म्हणाले, भीमाशंकरला दिलीप वळसे पाटील यांच्या वडिलांसोबत अर्थात दत्तात्रय वळसे-पाटील यांच्यासोबत गेलो होतो. त्यावेळी मी महाराष्ट्राचा उद्योगमंत्री होतो. एका खोलीत आमची राहण्याची सोय करण्यात आली आणि त्याचवेळी रात्री एकच्या सुमारास मला काहीशी हालचाल जाणवली. उठून बसलो तर माझ्या अंगावरून एक साप सरपटत खिडकीतून बाहेर गेला. मी पाच मिनिटे सुन्न झालो आणि दत्तात्रय पाटील यांना हाक मारली आणि घडलेला प्रकार सांगितला.

दत्तात्रय पाटील यांना ते एकून आनंदाने उकळ्या फुटल्या. ते म्हणाले, हा शुभशकुन आहे. आपण उद्या पहाटे पूजा करू. त्यांचा सल्ला ऐकून मी पूजा केली. आणि मग आम्ही दोघेही मुंबईला परतलो. त्याच दिवशी विधानसभेत अशा काही घडामोडी घडल्या की मी पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आठ दिवसांत मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्रीच झालो. दिलीप वळसे-पाटील यांच्या वडिलांनी सांगितल्याप्रमाणे तो शुभशकुन मी त्यावेळी अनुभवला. त्यानंतर माझी पत्नी सातत्याने भीमाशंकरला जाते. मी काही फारसा जात नाही. ही आठवण सांगताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

एकदा दिलीपरावांचे वडील दत्तात्रय पाटील माज्याकडे दिलीपला घेऊन आले. माझा मुलगा ग्रॅज्युएट झाला. त्याला नोकरी लावा, अशी विनंती त्यांनी मला केली. त्यावेळी राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष नानासाहेब सकपाळ होते. मी त्यांना सांगितले की, तुमच्याकडे जागा आहे की नाही मला माहिती नाही, पण आपल्या माणसाचा मुलगा आहे त्याच्या नोकरीचे बघा, असे सांगून मी दिलीपला त्यांच्याकडे पाठवले. त्यानंतर काय घडले माहिती नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नंदुरबार-धुळे मार्गावर भीषण अपघात

swarit

यंदाच्या पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशातील विद्यार्थ्यांना मराठा आरक्षण लागू नाही | नागपूर खंडपीठ

News Desk

‘आम्ही आणू बाप्पा तुमच्या घरी’, मनसेचे नवा अभिनव उपक्रम!

News Desk