HW News Marathi
महाराष्ट्र

५० लाख रुपये द्या, अन्यथा वैद्यनाथ मंदिर RDX ने उडवू!; विश्वस्तांना आलेल्या पत्राने खळबळ

बीड | १२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या बीडमधील प्रभू वैद्यनाथाचे मंदिर बॉम्ब लावून उडवून देऊ अशी धमकी मिळाल्याने परळी शहरात एकच खळबळ उडाली आहे. शुक्रवार दिनांक २६ नोव्हेंबर रोजी वैद्यनाथ देवस्थान कमिटीचे विश्वस्त यांच्या नावाने आलेल्या या धमकीने पोलीस प्रशासन हाय अलर्टवर असून मंदिर व परिसरात बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
१२ ज्योतिर्लिंगांपैकी ५ व्या क्रमांकाचे ज्योतिर्लिंग असलेल्या परळी येथील प्रभू वैद्यनाथ देवस्थानमिटीचे विश्वस्त यांना आपण फार मोठ्या मंदिर संस्थानचे विश्वस्त आहात. आतापर्यंत आपल्या मंदिराला भरमसाठ देणगी रुपाने रक्कम मिळाली आहे. मी फार मोठा नामी गुंड, ड्रग माफिया व गावठी पिस्तूलधारक आहे. मला तातडीची गरज भागविण्यासाठी ५० लाख रुपयांची गरज आहे. हे पत्र मिळताच पत्त्यावर रक्कम पोहोच करावी. अन्यथा मी वैद्यनाथ मंदिर माझ्याकडील आरडीएक्सने उडवीन, अशी धमकी कथित ड्रग माफियाने पत्राद्वारे दिली. यामुळे संस्थानच्या तक्रारीवरुन शहर ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलिसांनी मंदिराची सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे.
मार्च २०२० पासून हे मंदिर कोविडमुळे बंद ठेवण्यात आले होते. महिनाभरापूर्वी मंदिरे उघडण्याचा निर्णय झाल्याने हे मंदिर भाविकांसाठी खुले झाले. यामुळे भाविकांची गर्दी आहे. शुक्रवारी वैद्यनाथ मंदिर सचिव राजेश देशमुख हे मंदिरात आले असताना टपालाद्वारे आलेली पत्रे ते पाहत होते. यातील एक पत्र व्यंकट गुरुपद मठपती (स्वामी) या नावाने आले होते. ते त्यांनी वाचून पाहिले अन् त्यांना धक्का बसला. रतनसिंग रामसिंग दख्खने, रा. काळेश्वर नगर, विष्णूपुरी, नांदेड या पत्त्यावरुन हे पत्र आले असून सदरील पत्र शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून मंदिर व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

संजय राऊत यांचं किरीट सोमय्यांना पत्र

News Desk

केंद्र सरकारच्या ‘या’ निर्णयाला सुप्रिया सुळेंचा विरोध

News Desk

राज्यात काल 3,187 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 49 रुग्णांचा मृत्यू!

News Desk